सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

केस कापून घेणारे आणि करणाऱ्यांचा जवळून संबंध येतो. त्यामुळे प्रत्येकाने ते टाळावे. अन्यथा दोघांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असा प्रकार कोठे आढळल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी केले आहे.

मेढा (जि.सातारा) : "कोरोना'च्या पार्शभूमीवर सर्वच व्यवसाय बंद आहेत. यामध्ये सलूनची दुकानेही पूर्णत: बंद आहेत. अशा स्थितीत अनेक शहरात, गावांत घरोघरी व शेतात जाऊन केस- दाढी करणाऱ्या सलून व्यावसायिकांवर पोलिसांची 24 तास करडी नजर राहणार आहे.
 
सोनगाव (ता. जावळी) येथील सलून व्यावसायिक दीपक विठ्ठल पवार हा भिवडी येथे एका गुराच्या गोठ्यात केस कापताना आढळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक झाली आहे. त्यामुळे आपण घरातच राहा. बाहेर पडू नका. नाहीतर केस- दाढी करणारे व करून घेणारे या दोघांवरही कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, की मंगळवारी सकाळी कुडाळ येथे नाकाबंदी करत असताना एका निनावी फोनद्वारे भिवडी (ता. जावळी) येथे नितीन किसन विधाते यांच्या गुरांच्या गोठ्यात दीपक पवार (रा. सोनगाव) हा लोकांचे केस व दाढी करीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे, पोलिस लंकेश पराडके, होमगार्ड प्रकाश शिवणकर, पोलिस धनंजय माने यांनी त्या ठिकाणी छापा टाकून दीपक पवार याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या बाबतची फिर्याद पोलिस लंकेश पराडके यांनी दिली आहे. दरम्यान काल गुरुवारी जावळी तालुक्‍यात विनाकारण फिरणाऱ्या 31 व आज दहा मोटारसायकलवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

 रामायण, महाभारत बरोबरच ‘या’ मालिकाही सुरू करा : पृथ्वीराज चव्हाण

केस कापून घेणारे आणि करणाऱ्यांचा जवळून संबंध येतो. त्यामुळे प्रत्येकाने ते टाळावे. अन्यथा दोघांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असा प्रकार कोठे आढळल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी केले आहे.

कोरोनाशी लढताना... 

  • सामाजिक अंतर न राखणाऱ्या दुकानदारांना समज 
  • विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या दुचाकी जप्त 
  • अजिंक्‍यतारा किल्ल्यावर गेलेल्यांना ड्रोनच्या साह्याने पकडले 
  • गुरुवार परज परिसरात सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा 
  • तांबवेकरांना प्रतीक्षा तपासणी अहवालाची 
    सातारा सातारा सातारा सातारा साताारा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Barber In Satara District For Illegal Activity