ब्रेकिंग : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या क्लबवर गुन्हा दाखल

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या क्लबवर गुन्हा दाखल

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांचा बंदीचा आदेश डावलून येथील सातारा क्‍लब सुरू ठेवल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांचे आदेशन्वय आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा, क्रीडांगण, जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले आहेत.

सातारा क्लब सुरु ठेवल्याने संभाजी आनंदराव पाटील (रा. आडूळ, ता. पाटण), मोहन रामचंद्र चव्हाण (रा. नेर, ता. खटाव), विशाल रमेश चव्हाण (रा. वडुथ, ता. सातारा), अमीत रामचंद्र जाधव (रा. सदरबझार), विशाल प्रदीप सोळंकी (रा. सदरबझार) व अमीत नारायण कांबळे (रा. चिमणपूरा पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत हवालदार अमोल काशिनाथ साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस अधिक्षक समीर शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सातारा क्‍लबची आज (मंगळवार) सकाळी पाहणी केली. त्यावेळी तो सुरू असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली.

कोयना धरण, उद्यानात पर्यटकांसाठी प्रवेशबंदी 

कोयनानगर : येथे पर्यटकांना येण्यास प्रशासनाने प्रतिबंध केलेला नसला तरी कोयना पर्यटनाचा आत्मा असणारे जगप्रसिद्ध कोयना धरण आणि नयनरम्य नेहरू स्मृती उद्यानात पर्यटकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

 मला तुमच्या मदतीची गरज आहे; तुम्ही लवकर टीम घेऊन या

पर्यटनाची पंढरी अशी ओळख निर्माण असलेले कोयनानगर हे पर्यटनस्थळ पर्यटनाच्या ऐन सुगीच्या हंगामात बहरलेले आहे. पर्यटकांनी "ओव्हर फ्लो' असणाऱ्या कोयनेत कोरोनोचे संकट धडकले आहे. यामुळे बहरलेल्या कोयना पर्यटनाला याचा फटका बसला आहे. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडून गेला आहे. देशात सगळीकडे कोरोनोच्या विषाणूने थैमान घातल्यामुळेच पर्यटकांची कोयनेकडे वर्दळ सुरू आहे. कोयनानगर येथे येण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला नसल्याने कोयना पर्यटकांनी ओव्हर फ्लो झाले आहे. 

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनो आजाराची व्याप्ती वाढू नये म्हणून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणावर प्रतिबंध करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्यामुळे कोयना प्रकल्प प्रशासनाने आजपासून कोयना धरण व नयनरम्य नेहरू स्मृती उद्यानात पर्यटकांसाठी प्रवेशबंदी केली आहे. ही दोन्ही ठिकाणे कोयना पर्यटनाचा आत्मा म्हणून ओळखली जातात. 

कोरोनाचा रूग्ण नसल्याचा आरोग्य विभागाचा निर्वाळा 

ढेबेवाडी : कोरोनाचे काही संशयीत रुग्ण सापडल्याची परिसरात अफवा आहे. असा रुग्ण पूर्ण तालुक्‍यात नाही. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण सापडल्याची अफवा पसरली होती. येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसरातील विविध आरोग्य केंद्रात लोक मोबाईलवरून संपर्क साधून त्याबद्दल जाणून घेत होते. मात्र ती निव्वळ आफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

आपण शासकीय कर्मचारी आहात मालक नव्हे; भाजप नगराध्यक्षांचे 'त्यांना' प्रत्युत्तर 

त्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पाटील म्हणाले,'तालुक्‍यात कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही. यात्रा किंवा नोकरीनिमित्ताने परदेशी गेलेले तालुक्‍यातील नागरिक घरी परतलेले आहेत, त्यांची विमानतळावर तपासणी झाली आहे. त्यानंतरच त्यांना घरी पाठवले आहे. त्यापैकी कुणालाही सर्दी,खोकला,ताप असा त्रास नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com