बेळगावात मोकाट जनावरांसाठी गोशाळांची व्यवस्था

for cattle fish and cow in belgaum start a new policy of goshala in srinagar belgaum
for cattle fish and cow in belgaum start a new policy of goshala in srinagar belgaum

बेळगाव : महापालिकेच्या मालकीची गोशाळा (कॅटल शेड) अखेर सुरू झाली आहे. श्रीनगरमधील महापालिकेच्या जागेत स्मार्टसिटी योजनेतून ही गोशाळा बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी गोशाळेचा वापर सुरू झाला नव्हता. आता कालपासून गोशाळा सुरू केली असून, युनायटेड संस्थेकडे गोशाळेची जबाबदारी सोपविली आहे. यापुढे शहरातील मोकाट जनावरे या गोशाळेत ठेवली जातील, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.

नव्या गोशाळेत ५० जनावरे ठेवण्याची व्यवस्था आहे. याशिवाय पाणी, वीज व अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जनावरांसाठी आवश्‍यक चारा व खाद्य युनायटेड संस्थेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग सध्या निवडणूकसंबंधी कामांमध्ये व्यस्त असल्याने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरु झालेली नाही. पुढील आठवड्यात ही मोहीम सुरू केली जाईल.

शहरातील मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे. या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासह अपघातही होतात. चार वर्षांपूर्वी मोकाट जनावराच्या हल्ल्यात नरगुंदकर भावे चौकात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. तेव्हापासून शहरात कॅटल शेड किंवा गोशाळा व्हावी, अशी मागणी होती. मोकाट जनावरे पकडून ती आधी भुतरामट्टीतील गोशाळेत पाठविली जात होती. पण, तेथील व्यवस्थापनाने जनावरे स्वीकारण्यास नकार दिल्याने चार वर्षांपासून केके कोप्पमधील गोशाळेत जनावरे पाठविली जात आहेत. पण, त्या गोशाळेतही जनावरे स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे, महापालिकेने जनावरे पकडण्याची मोहीमच थांबविली होती. 

दोन महिन्यांपूर्वी केळकर बागेत मोकाट जनावराच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले. त्यामुळे, काही काळासाठी जनावरे स्वीकारण्याची विनंती महापालिकेने केल्यानंतर गोशाळेने जनावरे स्वीकारण्यास सुरवात केली. आता महापालिकेच्या मालकीची गोशाळा तयार झाल्याने ही समस्या उद्‌भवणार नाही.

दंडाच्या रकमेत वाढ

मोकाट जनावरे पकडून ती गोशाळेत ठेवल्यास त्यांच्या मालकांना दंड भरून ती घेऊन जावी लागतात. आधी प्रत्येक जनावरामागे दोन हजार रुपये दंड घेतला जात होता. जानेवारी २०२० मध्ये ती रक्कम चार हजार रुपये केली. तरीही शहरात जनावरे सोडण्याचा प्रकार सुरूच आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com