वृक्षारोपण करत साजरी  केली आषाढी एकादशी ः पहा कुठे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

संख (सांगली)ः नित्यनियमाने पायी दिंडीने पंढरपूरला आषाढी वारीला जाणारे चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी चिकलगी भुयार मठाच्या परिसरात आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकऱ्यांसमवेत वृक्षारोपन केले. तसेच वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला.

यावेळी पायी दिंडीने चिकलगी येथे आलेल्या वारकऱ्यांचा सत्कार तुकाराम बाबा महाराज यांनी केला. सोशल डिस्टन्सचे पालन करत चिकलगी येथे आषाढी एकादशी भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी आदटराव गुरुजी, राठोड गुरुजी, मल्लेश हत्ताळी, शिवराय महाराज, काशीराम चौगुले, सिद्धराय उमराणी, भुयारी मठाचे पुजारी, निंबोनी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आषाढी एकादशीला यंदा कोरोनामुळे पंढरपूरला जाता न आल्याने चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी चिकलगी येथील मठाच्या परिसरात वारकऱ्यांसमवेत वृक्षारोपण केले. चिकलगी येथे पायी दिंडीत आलेल्या वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करत बाबांनी वारकऱ्यांना आषाढी दिनी झाडे भेट देत आपल्या परिसरात वृक्षारोपण करा व ही झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrated Ashadi Ekadashi by planting trees: See where