सातारा - ढेबवाडी विभागात संयुक्त जयंती उत्साहात साजरी

जयभीम कांबळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

तळमावले (सातारा) : ढेबेवाडी (ता.पाटण) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचा कार्यक्रम उत्सहात पार पडला. येथील चंद्रमणी बौद्ध विहारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळ ढेबेवाडी पोलीस स्टेशन चे एपीआय स्वप्नील लोखंडे यांनी बौद्ध ध्वज फडकवून ध्वजवंदना दिली. त्यानंतर सामूहिक बौद्ध ध्वजवंदना घेण्यात आली. 

या कार्यक्रमावेळी समाजबांधवना मार्गदर्शन करताना लोखंडे म्हणाले की,  युवकांनी बाबासाहेबांचे विचार अंगिकारले पाहिजेत त्यातून विचरपरिवर्तनाची दिशा मिळते. या वेळीं प्रमुख पाहुणे म्हणून असलेले समाजसुधारक योगेश पाटणकर बोलताना म्हणाले की, स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, सामाजिक चळवळीला एक करण्यासाठी धडपडले पाहिजे असं मत त्यांनी मांडले.

बौद्ध संघटक ताराचंद पिलाजी सपकाळ,चंद्रकांत कांबळे- अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा , लक्ष्मण शेलार माजी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ,घनश्याम कांबळे- त्रिरश्मी सामाजिक संस्था अध्यक्ष, रमाकांत सावंत, केंद्रीय शिक्षक आर.बी पाटणकर यांसह विभागातील सर्व धम्मबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण शेलार यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कांबळे यांनी केले.

Web Title: celebration of ambedkar jayanti in dhebewadi satara