

सांगली : केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी घातक आणि जाचक आहेत. कायद्याविरोधात तीन ते चार महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारला हे कायदे बदलावेच लागतील. तसेच शेतकरी हिताचे व रक्षणाचे
कायदे आणावे लागतील असा इशारा कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे दिला.
केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी
संघटनांच्यावतीने दिल्लीत तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच आज शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा म्हणून कॉंग्रेस पक्षाने उपोषण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. तेव्हा डॉ. कदम बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार
मोहनराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक सचिन नाईक, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, शैलजा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कदम म्हणाले, 'केंद्रातील भाजप सरकारने जबरदस्तीने लादलेल्या कृषी कायद्यामुळे शेतकरी ग्रासला आहे. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी घातक व जाचक आहेत. या कायद्याविरोधात तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. परंतू त्यांच्याशी भाजप सरकारने कोणतीही ठोस चर्चा केलेली नाही. या आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झाले आहेत. सरकारने कायदा करताना कोणतीही विचारपूस केली नाही. या कायद्यात बदल करण्याची गरज आहे.
कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांचे उपोषण सुरूच
असून आज भारत बंदची हाक दिली होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी सूचना दिल्या आहेत. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि इतरांच्या सूचनेनुसार राज्यात आंदोलन केले जात आहे. केंद्रातील कृषी कायद्यात भाजप सरकारला निश्चित बदल करावाच लागेल. तसेच शेतकरी हिताचा आणि शेतकरी रक्षणाचा कायदा आणावा
लागेल.'
यावेळी नामदेवराव मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजीत भोसले, प्रकाश मुळके, अमर निंबाळकर, सुभाष खोत, अजित ढोले, मालन मोहिते, वृषाली वाघचवरे, सुवर्णा पाटील, सुहेल बलबंड आदींसह नगरसेवक, नगरसेविका,
पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस भवन परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.