
नगर ः घरी कितीही चांगलं जेवण बनवलं जात असलं किंवा बायको कितीही अन्नपूर्णेचा अवतार असली बाहेरच्या ताटात डोकवावं वाटतं. अहो, बाहेरचं म्हणजे हॉटेलचं खावं वाटतं. मग शोध सुरू होतो, कुठं जायचं, कोणत्या हॉटेलात चांगलं जेवण मिळतं. त्यातही खास मेन्यू आसन तर तिकडेच आपले पाय ओढले जातात.
कायहे नेमकं
नेमकं तुम्ही काय खातं यावर अवलंबून असतं. म्हणजे हेच की तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी. शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी एक गंमतय. त्याचं असं आहे की त्या हॉटेलात गेला आणि त्यांची वाढलेली थाळी चाटून पुसून खाल्ली की ते तुम्हाला पैसेही मागणार नाही आणि आयुष्यभराचं जेवण फुकट देणार. हे तर लईच भारी राव. असलं काय असंल तर सांगत जा ना..
अग्गा आयव पुण्यातंय हे..?
तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोणतंही जोखून (म्हणजे मापात) खाणाऱ्या पुण्यात अनोखं ताट आहे. खा कितीही, मागं हटायचं नाही. त्या थाळीचं नाव आहे बाहुबली थाळी! नावासारखीच ही जम्बो. हाऊस ऑफ पराठामध्ये हे अगडबंब ताट आहे. त्यातील ऍटम पाहूनच हादरून जाल. आपल्या गावाकडची सात-आठ माणसंही ती संपवू शकत नाही. देवसेना मिक्स पराठा, कटप्पा बिर्यानी, शिवगामी पंचपकवान, भल्लाल देव लस्सी आणि छास हे बाहुबलीतील हिरो-हिरोईनच्या नावाचे ऍटम खाताना आपल्याला पिक्चर बघितल्यासारखं वाटतं. शाही पनीर, लच्छा पराठा, जीरा राईस, पापड हे तर त्यात असणारच हो. पुऱ्या इंडियात असली थाळी नाही, असं या हॉटेलचे मालक दावा करतात.
काय ऍटम असत्यात त्यात
थाळीचं नाव बाहुबली, त्यातील ऍटमची नावंही त्यातलीच. अर्थातच ती कल्पना हॉटेलमालकाला तिकडूनच सुचली, असं प्रशांत साळवी सांगतात. या थाळीची आयडिया सूचवली खरी पण ती पूर्ण भरायला तीन महिने लागले. त्यामुळेच ती एकदम हटके झालीय. पराठा हाऊस म्हणल्यावर त्यात पराठा असणारच. पण त्येवही भला मोठा. शिवगामी पंचपकवान तर लय भारीय मेथी मलाई मटार, छोले, मटार मसाला असल्या भाज्या त्यात असत्यात. कुणी एकट्याने खाल्ली तर त्या मालकाने पैजही लावलीय. ही थाळी संपवली तर बिलाचं सोडा तुम्हाला आयुष्यभर पोसू, असं साळवींनी चॅलेंज दिलंय.
आपण बकासूर नाही पण ट्राय करायला काय जातंय, मी ठरवलंय एकदा चॅलेंज घ्यायचं. तुम्ही पण बघा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.