
मंगळवेढा (सोलापूर) : पंचायत समितीच्या सभापती निवडीत जिल्हा बॅंक संचालक बबनराव आवताडे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी पंचायत समिती गणाचा समतोल ठेवत निवडी केल्या आहेत. सभापती व गटविकास अधिकारी या दोन महिलाच असल्याने त्यांच्या कामाची चुणूक दाखवण्याचे आव्हान या दोघींसमोर असणार आहे.
हेही वाचा : मॅरेथॉनमध्ये फुगे फुगवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; सहाजण जखमी (Video)
आठ सदस्य असलेल्या पंचायत समितीत सर्वसाधारण गटातील एकही सदस्य नसताना सुरवातीला मरवडे गणातील प्रदीप खांडेकर यांना सभापती पदावर संधी दिली. उपसभापतीसाठी लक्ष्मी दहिवडी गणातील विमल पाटील यांना संधी देत धनगर व लिंगायत हा जातीय सलोखा ठेवण्यात आला. नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीत सभापतिपद महिलेसाठी राखीव झाले. त्यात या पदासाठी चोखामेळानगर गणातील उज्ज्वला मस्के, हुलजंती गणातील प्रेरणा मासाळ या दोघी दावेदार होत्या. त्यामुळे या दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता असताना तालुक्याच्या कर्नाटक सीमेवर हुलजंतीतील युवा चेहरा असलेल्या प्रेरणा मासाळ यांना एक वर्षासाठी संधी देत पंचायत समितीची सूत्रे दिली.
हेही वाचा : सोलापूर रनर्स असोसिएशनतर्फे आंतराष्ट्रीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा झाली
हुलजंती आणि भोसे गणात ताकद मजबूत
उपसभापतीसाठी विधानसभा निवडणुकीत आवताडे गटाला सोडचिठ्ठी देऊन परिचारक गटाचा आश्रय घेतलेल्यांना परत घेत सुरेश ढोणे यांना संधी दिली. यात हुलजंती आणि भोसे हे दोन्ही गण परस्परविरोधी असल्याने या गणात भविष्यात आपली ताकद मजबूत करता येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हुलजंती व भोसे या दोन मोठ्या गावात देखील आवताडे यांना कमी मताधिक्य मिळाले. तो गट टिकवून ठेवून मतात वाढ करण्याच्या दृष्टीने ही दोन गावे निर्णायक ठरणार आहेत. तर, उर्वरित एक वर्षासाठी उज्ज्वला मस्के यांना संधी दिल्यानंतर सर्व जाती-धर्माला न्याय दिल्यासारखे होणार असून तीन सदस्य असलेल्या आवताडे गटाला जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद मिळवता आले. त्याचा फायदा घेत त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिक निधी व कामे मिळवता येणार असून त्यातून तालुक्याच्या विकासासाठी नवीन कामे करण्याचे आव्हान या नवीन सभापती व उपसभापतीसमोर असणार आहे.
हेही वाचा : सोलापुरकर धावले!
योजना प्रभावीपणे राबविल्या
सभापती प्रदीप खांडेकर यांनी आपल्या अडीच वर्षांच्या काळात सर्व राजकीय गटाची नाराजी न स्वीकारता सभापती कार्यालयात येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आपला समजून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी कोणाचीही नाराजी पत्करली नाही. त्याचा फायदा विधानसभेला अवताडे यांच्या मतात वाढ होण्यासाठी झाला आहे. हा ट्रोल पुढे भविष्यात ठेवण्यासाठी जबाबदारी आता या नवोदित पदाधिकाऱ्यांवर आली आहे. सभापती प्रदीप खांडेकर यांनी ऑनलाइन कामकाज, घरकुल, स्वच्छतागृह, दलित वस्तीचा निधी, कृषीच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीला पुणे विभागात अनेक पुरस्कार मिळाले. आता नवोदित पदाधिकाऱ्यांना तालुक्यात काम वाढवण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
कार्यकर्त्यांचे जाळे वाढवण्यावर भर
भोसे पंचायत समिती गणातील वंचित गावांना पंचायत समितीच्या योजनेचा लाभ मिळवून देताना राजकीय भेदभाव न करता पात्र लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय जिल्हा बॅंक संचालक बबनराव आवताडे व समाधान आवताडे यांनी संधी दिली असून कार्यकर्त्यांचे जाळे देखील वाढवण्यावर भर देणार आहे.
- सुरेश ढोणे, उपसभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.