Chandoli Dam Rainfall Update : 19 हजार क्युसेकने वाढतेय पाणी! चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस, परिस्थिती चिंताजनक? पाथरपुंजची स्थिती काय?

Chandoli Dam Water Level and Inflow Update : चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून रस्ते बंद झाले आहेत. धरणात १९,२१४ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून जलसाठा १७.८८ टीएमसी म्हणजेच ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Chandoli Dam heavy rainfall update

Chandoli Dam heavy rainfall update

esakal

Updated on

वारणावती (सांगली) : चांदोली धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. मंगळवारी मणदूर येथील ज्ञानदेव तुकाराम भाष्टे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. करुंगली ते गुंडगेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर महादेवटोंगी तसेच खिंडीत अशा दोन ठिकाणी दरड कोसळल्याने डोंगर माथ्यावर वसलेल्या गुंडगेवाडी, खोतवाडी, काशीदवाडी येथील नागरिकांची येण्या-जाण्याची गैरसोय झाली. हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com