सात हजार जणांनी केले चांदोली पर्यटन; धरणासह अभयारण्य, गुढे पाचगणी पठारावरील पवनचक्की पाहण्यास पसंती

खासगी बस असेल तर प्रत्येकाचे आधार कार्ड किंवा अन्य ओळखीचा पुरावा असणे आवश्‍यक आहे. शालेय सहलीसाठी शाळेचे पत्र आवश्यक आहे.
Chandoli National Park
Chandoli National ParkSakal

शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यान साडेसात महिन्यांपासून पर्यटकांसाठी सुरू असल्याने दिवाळी सुटी, शालेय सहली व मे महिन्याच्या सुटीमध्ये अनेक पर्यटकांनी चांदोली धरण, अभयारण्य, गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहण्याला पसंती दिली. १५ ऑक्टोबर २०२३ ते ९ मे २०२४ दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसह अन्य अशा ६९०८ हून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.

आता पावसाळा सुरू झाल्याने व १५ तारखेपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद होणार आहे. तेव्हा आता पर्यटकांना केवळ चार दिवस पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. चांदोलीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पास देण्याची व्यवस्था जाधववाडी येथील वन्यजीव विभागाच्या नाक्यावर केली आहे.

त्यासाठी आधार कार्ड, वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र या पैकी एकाची आवश्‍यकता आहे. खासगी बस असेल तर प्रत्येकाचे आधार कार्ड किंवा अन्य ओळखीचा पुरावा असणे आवश्‍यक आहे. शालेय सहलीसाठी शाळेचे पत्र आवश्यक आहे.

२०० हून अधिक प्राण्यांची नोंद

मेमध्ये बुद्ध पौर्णिमेदिवशी पाणवठ्यावरील गणनेत बिबट्या १, गवे ९१, सांबर १६, रानकुत्री ३, असे १९, पिसोरी /गेळा १, भेकर १७ , अस्वले ८, उदमांजर ५, माकड ५, साळिंदर २, मुंगुस ३, शेकरू ७, वाटवाघूळ २, चकोत्री ५, रानकोंबडा १२, घुबड २, सर्पगरुड २, मोर १०, पर्वती कस्तुर ६, पांढऱ्या गालाचा कटुरगा ५, लाल बुडाचा बुलबुल १५, केसरी डोक्याचा कस्तुर २, धामण १, घोरपड १. रात्री पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या २०० हून अधिक प्राण्यांची नोंद झाली आहे.

पर्यटकांच्या भेटी

 • १५ऑक्टोबर २०२३ ते ९ मे २०२४

 • प्रौढ व्यक्ती -५२७९

 • लहान मुले सहलीसह-१६२९

 • सहली संख्या -१२

 • खासगी वाहने -७३१

 • एकूण पर्यटक -६९०८

पर्यटन शुल्क

 • बारा वर्षांखालील मुले - प्रत्येकी ५० रुपये

 • प्रौढ व्यक्ती -१०० रुपये

 • गाईड शुल्क -२५० रुपये

 • वाहन प्रवेश - लहान १००, बस १५०

 • छोटा कॅमेरा -५०, मोठा १००

वन्यजीव विभागाचे वाहन असल्यास - प्रत्येक मुलांसाठी २०० रुपये (प्रवेश शुल्क ५०, बस शुल्क १००, गाईड ५०). प्रौढ व्यक्ती २५० रुपये (प्रवेश शुल्क १००, बस शुल्क १००, गाईड ५०).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com