Sagreshwar to Chandoli deer relocation
esakal
वारणावती : चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात वाघांच्या पुनर्वसनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने वन विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘ऑपरेशन तारा’अंतर्गत वाघांना पुरेसे नैसर्गिक खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातून २०० हरणांचे चांदोलीत स्थलांतर करण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या काही दिवसांत या हरणांना चांदोलीच्या जंगलात सोडण्यात येणार (Chandoli tiger rehabilitation project latest news) आहे.