Shirala : कसलं तिळगूळ अन् कसली भोगी!, चांदोली अभयारण्यग्रस्तांची व्यथा; मणदूर येथे सात दिवसांपासून आंदोलन
सोमवारी भोगीचा सण व मंगळवारी मकर संक्रांत हे सण सर्वत्र साजरे करत असताना जिल्ह्यातील चांदोली, ढाकाळे, सोनार्ली पैकी धनगरवाडा, तनाळी, निवळे, तांबवेपैकी कुल्याचीवाडी, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे या सात गावांतील ३५० हून अधिक महिला व पुरुष गेल्या सात दिवसांपासून ठिय्या मांडून आहेत.
Villagers from Chandoli Sanctuary in Mandur protesting for their rights and justiceSakal
शिराळा : ‘कसलं तिळगूळ आणि कसली भोगी? आम्ही आमच्या जीवनात असुविधांचा भोग भोगतोय. आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून जीव तीळ-तीळ तुटतोय. त्यामुळे कसला सणवार,’ अशी व्यथा चांदोली अभ्यारण्यग्रस्त आंदोलकांनी व्यक्त केली.