
सांगली : ठाकरेंच्या शिवसेनेत अचानक प्रवेश करत सांगली लोकसभा मतदार संघात धुरळा उडवून देणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. ठाणे येथे (ता. ९) दुपारी चार वाजता त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. राज्यपाल नियुक्त पाच रिक्त जागांपैकी एका जागेवर त्यांना विधान परिषद सदस्यत्वाचा शब्द देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे.