चंद्रकांतदादांनी जाणला 'हा' महाडिक पॅटर्न...

Chandrakant Dada realized the 'Mahadik' pattern sangli marathi news
Chandrakant Dada realized the 'Mahadik' pattern sangli marathi news

इस्लामपूर (सांगली) - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक पॅटर्न म्हणजे नक्की काय ? तो कसा चालतो? नेमके कशामुळे महाडिक पॅटर्नला यश मिळते? हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी महाडिक कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या येलूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, युवानेते सम्राट महाडिक, येलुरचे माजी सरपंच राजन महाडिक यांच्याकडून महाडिक पॅटर्न बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली.
ते म्हणाले,‘‘महाडिक पॅटर्न हा आदर्शवत व वेगळा पॅटर्न आहे. त्यामुळेच महाडिक कुटुंबाचे पश्‍चिम महाराष्ट्रात विशेष असे स्थान आहे. अनेक दशकांपासून महाडिक कुटुंबीय ज्यांच्या समवेत असते त्यांचा विजय निश्‍चित असे जणू समीकरणच बनले. 

महाडिक पॅटर्नचे असे हे सदस्य

येलूर हे महाडिक कुटुंबीयांची राजकीय पंढरीच आहे. भीमराव महाडिक, शामराव महाडिक, पांडुरंग महाडिक, विष्णुपंत महाडिक, महादेवराव महाडिक, शंकर महाडिक, नानासाहेब महाडिक या पहिल्या पिढीने जो शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक व राजकीय पाया रचला त्यावर कळस चढवण्याचे काम धनंजय महाडिक, अमल महाडिक, स्वरूप महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, राजन महाडिक या दुसऱ्या पिढीकडून अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
त्यांनी संपूर्ण महाडिक कुटुंबीयांचा आतापर्यंतचा कौटुंबिक, कृषी, सामाजिक व राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. ज्येष्ठ नेते जिल्हा बॅंकेचे संचालक सी. बी पाटील, भगवान जाधव, बबन शिंदे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com