अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) असलेले माजी खासदार संजय पाटील या कार्यशाळेला उपस्थित होते. पहिल्या रांगेत त्यांना स्थान होते.
सांगली : ‘‘माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) हे आम्हा सर्वांचे मित्र आहेत. त्या नात्याने ते कोल्हापुरातील भाजपच्या (BJP) मेळाव्याला आले आणि बसले,’’ असा खुलासा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. कोल्हापूर येथे रविवारी (ता. १६) भाजपची संघटनपर्व कार्यशाळा झाली.