Chandrakant Patil : कवलापूरला चार्टर विमानतळ करू: पालकमंत्री चंद्रकांत पाटील; अधिवेशनानंतर आढावा घेऊन कार्यवाही
Sangli News : ‘मार्च महिन्यात अधिवेशन संपल्यानंतर त्याबाबतचा आढावा घेणे सुरू करू. कवलापूर विमानतळासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत लहान धावपट्टी होईल. मोठ्या विमानतळासाठी आणखी जादा जागेची आवश्यकता लागेल.
Minister Chandrakant Patil announces plans for a charter airport in Kawalapur, with a review and action to follow after the legislative session."Sakal
सांगली : कवलापूर विमानतळाच्या सध्याच्या जागेत लहान धावपट्टी होऊ शकते. त्यामुळे तेथे चार्टर विमाने उतरतील, असे विमानतळ करता येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार करता येईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.