जनतेच्या सहभागातून होणारा बदल व विकास हेच खऱे स्वातंत्र्य - अण्णा हजारे

मार्तंड बुचूडे 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पारनेर(नगर) - सरकार, प्रशासकिय अधिकारी व जनता ज्या वेळी हातात हात घालून काम करतात त्या वेळी मोठे काम होते. जनतेच्या सहभागातून होणारा बदल व विकास हेच खऱे  स्वातंत्र्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

पारनेर(नगर) - सरकार, प्रशासकिय अधिकारी व जनता ज्या वेळी हातात हात घालून काम करतात त्या वेळी मोठे काम होते. जनतेच्या सहभागातून होणारा बदल व विकास हेच खऱे  स्वातंत्र्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

पारनेर येथील पोलिस ठाण्याच्या नुतणीकरणाच्या ईमारतीचे व पोलीस विश्रामीकेचे ऊदघाटन हजारे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पोलिस अधिक्षक रंजणकुमार शर्मा, सहाय्यक पोलीस अधिक्षक अरूण जगताप, पोलीस निऱीक्षक हनुमंतराव गाडे, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा वर्षा नगरे, पंचायतचे कार्यकारी अधिकारी देवेंद्र परदेशी, अशोक कटारीया, गंगाराम बेलकर, समीर अंबे, शंकर नगरे, शाहीर गायकवाड, संजय वाघमारे, अॅड. सचिन पठारे, दत्ता अंबुले, नंदू औटी  आदी मान्यवर ऊपस्थीत होते. 

लोकांच्या सहभागातून होणारा बदल हा महत्वाचा असतो मी आणि माझे असे करूण देशात सुराज्य येणार नाही.प्रतेकाला समाजाप्रती तळमळ असावी. आपल्या देशाची घटणा सुंदर आहे तीच्यात मोठी शक्ती आहे. कायदा व सुव्यस्था ही हातात हात घालून काम करत असते. जनता जर एकत्र आली तर कोणतेही मोठे काम सहज होत असते जनतेच्या एकोप्यावरच देशाची प्रगती आवलंबून असते असेही हजारे म्हणाले.

शर्मा म्हणाले, लोकसहभाग व सहकार्यातून मोठे काम होते, आम्हाला जनतेचे सहकार्य असल्याशिवाय आम्हीही जनतेला चांगली सेवा देऊ शकत नाही. आम्ही नगर येथे कर्मच्या-यांच्या सहभागातून 90 लाखाचे मंगल कार्यालय ऊभे केले आहे. येथेही ही जनसहभागातून वास्तू ऊभी केली हे खूप मोठे काम झाले आहे. आपल्या दिलासा व सायबर या दोन शाखा अतीशय चांगले काम करत आहेत. त्यांना एक वर्ष पुर्ण झाले आहे यात कोटुंबिक वाद, त्यावर सल्ला देणे, येथे सामोपचाराने वाद मिटवण्याचे काम चालते. या वेळी जगताप, कटारिया, वाघमारे, गायकवाड, अॅड.पठारे आदीची भाषणे झाली.
 

Web Title: The change and development of the masses is the true freedom - Anna Hazare