सर्व माध्यमांच्या शाळांच्या दिवाळीच्या सुटीत बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

निवडणूक काळात प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कर्मचारी म्हणून नेमण्यात आल्याने यासंबंधी सर्व संघटनांनी या सुटीत बदल करण्यासाठी प्रशासनास विनंती केली होती. 

सातारा : सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना यावर्षीची दिवाळीची सुटी 23 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबरअखेर (रविवार वगळून) जाहीर केली आहे.
 
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोबरला मतदान होत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुटीत जिल्हा प्रशासनाने बदल केला आहे. यासंबंधी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी पत्रक काढले आहे. यानुसार दिवाळी सुटी 23 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबर (रविवार वगळून) अशी जाहीर केली आहे.

यापूर्वी या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला सुटीचे परिपत्रक पाच जूनला जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 21 ऑक्‍टोबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर केली होती. मात्र, निवडणूक काळात प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कर्मचारी म्हणून नेमण्यात आल्याने यासंबंधी सर्व संघटनांनी या सुटीत बदल करण्यासाठी विनंती केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in Diwali holidays for all media schools