बेळगाव : शिव-बसव जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

दोन दिवस राहणार बदल : पोलिस आयुक्त
Changes in city transport routes on  occasion of Shiv Basav Jayanti belgaum
Changes in city transport routes on occasion of Shiv Basav Jayanti belgaum sakal

बेळगाव : शिव बसव जयंतीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मंगळवार (ता.३) जगत ज्योती श्री बसवेश्वर जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. चन्नम्मा सर्कल येथून मिरवणुकीची सुरुवात होऊन काकतीवेस शनिवार खुट, गणपत गल्ली, कमळी खुट, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खुट, कॉलेज रोड मार्गे लिंगराज कॉलेज येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. या काळात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारी उडू नये यासाठी उद्या सकाळी ८ ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे.

केएलई रोड कोल्हापूर सर्कलकडून चन्नम्मा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी वाय जंक्शन येथून वळण घेऊन लक्ष्मी कॉम्प्लेक्स, सदाशिवनगर येथून पुढे जात ग्लोब थेटर सर्कल मार्गे पुढे जावे. चन्नम्मा सर्कलकडून कॉलेज रोड मार्गे संचयणी सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी चन्नम्मा सर्कल गणेश मंदिर येथून वळण घेऊन क्लब रोड, गांधी सर्कल मागे पुढे जाऊन ग्लोब थेटर मार्गे पुढे जावे. मध्यवर्ती बस स्थानकाकडून खडेबाजार रोड मार्गे शनिवार खुटकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी मध्यवर्ती बस स्थानक येथून वळण घेऊन आरटीओ सर्कल ओल्ड पीबी रोड मार्गे पुढे जावे. जिजामाता सर्कल देशपांडे पेट्रोल पंपकडून नरगुंडकर भावे चौक, कमळी खुटकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी रविवार पेठ, पिंपळ कट्टा येथून वळण घेऊन पाटील गल्ली स्टेशन रोड मार्गे खानापूर रोड पुढे जावे. मिरवणुकीच्या मार्गावरील चन्नम्मा सर्कल पासून काकती वेस शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड या मार्गावरील दोन्ही बाजूला सकाळी ८ ते रात्री दहापर्यंत सर्व प्रकारची वाहने पार्किंग करण्यास निर्बंध असणार आहेत.

शिवजयंतीनिमित्त ४ तारखेला वाहतूक मार्गात बदल.

बुधवार (ता.४) छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त नरगुंडकर भावे चौकातून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मारुती गल्ली. हुतात्मा चौक. रामदेव गल्ली. समादेवी गल्ली. कॉलेज रोड. धर्मवीर संभाजी चौक. रामलिंग खिंड गल्ली. सम्राट अशोक चौक. टिळक चौक. हेमूकलानी चौक. शनी मंदिर. कपलेश्वर ब्रिज मार्गे कपलेश्वर मंदिर नजीक सांगता होणार आहे. त्यामुळे दुपारी २ पासून मिरवणूक संपेपर्यंत खालील वाहतूक मार्गात बदल असणार आहेत. चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे खानापूरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाने चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिर येथून वळण घेऊन क्लब रोड गांधी सर्कल मार्गे पुढे जाऊन ग्लोब थेटर येथून खानापूर रस्त्याकडे जावे.

जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंद भावे चौक, पिंपळ कट्टा, पाटील गल्लीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी जिजामाता सर्कल येथून ओल्ड पी.बी. रोड मार्गे पुढे जावे. मिरवणुकीच्या मार्गावरील नर्गुंडकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर ओवर ब्रिज, कपलेश्वर मंदिर या रस्त्याच्या दोन्ही कडेला दुपारी दोन पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारची वाहने पार्क करण्यास निर्बंध असणार आहेत. नाथ पै सर्कल येथून बँक ऑफ इंडिया मार्गावरून कपलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज मार्गे जाणारी सर्व प्रकारचे वाहनानी एसपीएम रोड भातकांडे स्कूल क्रॉस येथून वळण घेऊन कपलेश्वर कॉलनी मार्गे व्हीआरएल लॉजिस्टिक्स मार्गे पुढे जावे. ओल्ड पी.बी रोड भातकांडे स्कूल, कपलेश्वर रेल्वे ब्रीज मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी भातकांडे स्कूल येथून वळण घेऊन शिवाजी गार्डन, बँक ऑफ इंडिया क्रॉस महात्मा फुले रोड मागे पुढे जावे.

ओल्ड पी.बी रोड यश हॉस्पिटल महाद्वार रोड कपलेश्वर मंदिर मार्गे रेल्वे ओव्हर ब्रिज कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी यश हॉस्पिटल येथून घेऊन भातकांडे स्कूल तानाजी गल्ली रेल्वे गेट मार्गे पुढे जावे. गुड्स शेड रोड मार्गे कपलेश्वर ब्रिजकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी एसपीएम रोड मराठा मंदिर गोवे सर्कल येथून पुढे जावे.

खानापूर रोड बीएसएनएल कार्यालय स्टेशन रोड आणि गोगटे सर्कल कडून रेल्वे स्टेशन हेड पोस्ट ऑफिस सर्कल मार्गे शनी मंदिरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी ग्लोब सर्कल येथून वळण घेऊन शर्कत पार्क केंद्रीय विद्यालय नंबर २ शौर्य चौक गांधी सर्कल, रोड चन्नम्मा सर्कल येथून पुढे जावे. वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याने नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com