मरकजमधील तरूणासह 7 जणांवर गुन्हा ; तपासणी चुकवून लपल्याने दणका

charged files against Seven people including a young boy from Markaz
charged files against Seven people including a young boy from Markaz

बेळगाव - दिल्ली येथील तबलिगी मरकजला जाऊन आल्यानंतर आपली कोरोना तपासणी करून न घेता लपून बसलेल्या हिरेबागेवाडी येथील एका युवकासह त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य 6 जणांवरविरोधात हिरेबागेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता.11) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. 


देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावास कारणीभूत ठरलेल्या दिल्ली येथील तबलीग मरकज या धर्मसभेला उपस्थित राहून गावी परत आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना तपासणी करून घ्यावी. असा आदेश शासनाने बजवला आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तबलीग मरकजला जाऊन आलेला हिरेबागेवाडी येथील तबलीग जमातीचा एक युवक अद्यापही आपली वैद्यकीय तपासणी करून न घेता लपून बसला असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटच्या टास्क फोर्सने हिरेबागेवाडी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस तपासादरम्यान हिरेबागेवाडी गावातील तबलीग जमातीचा कार्यदर्शी आणि काही नेत्यांनी पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली. परिणामी संबंधित युवकाला लपून बसण्यास मदत केल्याच्या आरोपावरून अन्य सहा जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिरेबागेवाडी गावात यापूर्वीच जमातीला जाऊन आलेल्या एका युवकाला कोरोनाची लागन झाली आहे. या युवकाच्या संपर्कात त्याचे आई-वडील आणि भाऊ आला असल्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एकाच गावात चौघांना कोरोना झाल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता लपून बसलेल्या या दुसऱ्या युवकालाही ताब्यात घेतले आहे. तबलीग मरकजला जाऊन आलेल्यांनी स्वतःहून कोरोना तपासणीस हजर राहावे, असे आवाहन केले आहे. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक एन. एन. अंबिगेर पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com