पाणीपट्टीसाठीचा जत नगरपालिकेने दिलेला चेक बाऊन्स

पाणीपट्टीसाठीचा जत नगरपालिकेने दिलेला चेक बाऊन्स

जत - म्हैसाळ जलसिंचनयोजनेच्या पाणीपट्टीसाठी जत नगरपालिकेने दिलेला अडीच लाखाचा चेक बाऊन्स झाला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावात या योजनेतून पाणी सोडण्याची अपेक्षा धूसर बनली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहराला जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

५२ हजारच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहराला बिरनाळ तलावातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र ऐन उन्हाळ्यात तलावातील पाणी साठा संपल्याने टँकर लावावे लागत होते. संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करताना प्रशासनाची तारांबळ उडायची. २०१२ ला पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर सुरू करण्याची वेळ आली होती. त्यावेळी आमदार विलासराव जगताप व नेते सुरेश शिंदे यांनी म्हैसाळ योजनेची पाहणी करून म्हैसाळ उपसासिंचन योजनेतून बिरनाळ तलावात पाणी सोडता येते तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे मांडण्यात आला.

तत्कालीन जिल्हाधिकारी कुशवाह यांनी टंचाईतून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे बिरनाळ तलावात पाणी सोडण्याच्या मार्गावरील काटे दूर झाले. त्यामुळे शहराची तहान भागत आहे.

प्रारंभी टंचाईतून पैसे भरून तलावात पाणी सोडले गेले. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिकसमोर पर्याय राहिला नाही. पालिकेने ६ जून २०१८ ला तत्कालीन मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या सहीने कार्यकारी अभियंता म्हैसाळ उपसिंचन व्यवस्थापन, सांगली यांच्या नावे २ लाख ५० हजाराचा (नंबर ०३६८८७) चेक दिला. मात्र पालिकेच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाला आहे. त्यानंतर आद्यपर्यंत ही रक्कम पालिकेने भरली नाही. 

वसुली संथगतीने 
नोटाबंदी झाल्यानंतर पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली चांगली होती. या वसुलीसाठी तत्कालीन मुख्याधिकारी सौ पल्लवी पाटील यांनी चांगल्या उपाययोजना केल्या होत्या. त्यांच्या बदलीनंतर वसुलीला ब्रेक लागला आहे. वसुली संथ गतीने सुरू असल्याने पालिकेचे उत्पन्न घेटले आहे. त्यामुळेच अशी संकटे उभी राहिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com