राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळाला पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil
राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळाला पाहिजे

बेळगाव : राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळाला पाहिजे

बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या ३८ मराठी तरुणावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. हे तरुण गेले महिनाभर तुरुंगात खितपत पडले आहेत.राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)अवमानाविरुध्द लढणाऱ्या या शिवभक्तांवर राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची कन्नड प्रशासनाची कृती शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहचवणारी आहे. या अन्यायी कारवाई प्रश्री भारतीय जनता पक्षाचे (BJP)प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil)यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

निवेदन देतेवेळी चर्चेत कर्नाटक (Karnataka)राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण याप्रश्नी लक्ष घालून मा. मुख्यमंत्री कर्नाटक यांचेशी संपर्क साधावा व राजद्रोहाचा गुन्हामागे घेण्याविषयी गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या प्रसंगी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठवून आपल्या भावना कळवितो व प्रत्यक्ष फोन वरून संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे बबनराव रानगे,शशिकांत पाटील,प्रकाश पाटील, प्रताप नाईक, अवधुत पाटील आदी उपस्थित हाेते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top