पुरग्रस्तांची मदत परत घ्या म्हणत मुख्यमंत्र्यांना दिला धनादेश

सांगलीत भाजपाचे आंदोलन
सांगलीत भाजपाचे आंदोलन
सांगलीत भाजपाचे आंदोलनsakal
Updated on

सांगली : राज्य सरकारने पूरग्रस्तांना जाहीर केलेली सरसकट मदत न देता तुटपुंज्या मदतीवर पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, खोकीधारक यांची बोळवण केली होती. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने पूरग्रस्तांचे मदत परत घ्या आंदोलन केले. यावेळी पूरग्रस्तांनी सरकारकडून आलेली तुटपुंजी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धनादेशाद्वारे परत केली.

सांगली शहर जिल्हा भाजपच्या वतीने मेन रोडवरील मित्रमंडळ चौकात हे आंदोलन केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, महापालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेवक सुब्राव मद्रासी, महिला जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, नगरसेविका भारती दिगडे, कल्पना कोळेकर, मुन्ना कुरणे, दीपक माने, अविनाश मोहिते आदी उपस्थित होते.

सांगलीत भाजपाचे आंदोलन
उमरगा शहरात 'आयपीएल' वर करोडोचा खेळला गेला सट्टाबाजार !

तीन महिन्यापुर्वी कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगलीमधील हजारो शेतकरी, व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायीक, पुरग्रस्त नागरीक यांचे मोठे नुकसान झाले. कोरोना महामारीमुळे डबघाईला आलेले व्यापारी, व्यावसायिक पुरामुळे हतबल झाले आहेत. असे असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुरग्रस्त व्यापाऱ्यांचे, दुकानदारांचे एकतर्फी, खोटे, चुकीचे व बोगस पंचनामे करुन सरसकट जाहीर केलेली पन्नास हजार रुपयांची मदत न देता पाचशे, पंधराशे, बावीसशे, अडीच हजार, पाच हजार, सहा हजार अशा प्रकारे मनमानी पध्दतीने दुकानदार, व्यापारी, व्यावसायीक यांचे बँक खात्यावर जमा करुन पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा व थट्टा केली आहे. अशाप्रकारे बेजबाबदारपणे दिलेली मदत आज सांगली शहरातील पूरग्रस्त दुकानदार, व्यापारी, खोकीधारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, यांना धनादेशाद्वारे परत पाठवून निषेध व्यक्त केला.

सन २०१९ साली आलेल्या महापुरावेळी तत्कालीन फडणवीस सरकारने सांगलीतील पुरग्रस्त कुटुंबाना पंधरा हजार, दुकानदार, व्यावसायीक, खोकीधारक यांना सरसकट पन्नास हजार, पडझड झालेल्या घरांना ९५ हजार ते दीड लाख रुपये मदत दिली होती शिवाय भोजन भत्ता, ज्यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली त्यांना घरभाडे, शेतकऱ्यांना हेक्टरी ९५ हजार, पशुधनासाठी, जनावरांचे गोठ्यासाठी आर्थिक मदत ताबडतोब दिलेली होती. त्यामुळे २०१९ सालच्या मदतीप्रमाणे सन २०२१ च्या पुरग्रस्तांना मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur contractor bribery allegations
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com