सोलापूर : तीनशे पोलिसांना चिक्कीचे वाटप

gan.jpg
gan.jpg

सोलापूर : ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिस बांधवांविषयी स्नेह व्यक्त करीत शिवाजी चौकातील सोन्या गणपती प्रतिष्ठानने रविवारी "सकाळ'चा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबविला. जवळपास 300 पोलिसांना चिक्की, राजगिरा लाडू आणि पाण्याची बाटली देण्यात आली. 

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाची माहिती सांगितली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते "श्रीं'ची आरती करण्यात आली. या वेळी सोन्या गणपती प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शंतनू साळुंखे, ज्येष्ठ सदस्य संतोष साळुंखे, हरिभाऊ पवार, पवनसिंग चव्हाण, प्रभाकर माने, विशाल कणसे, अजित चव्हाण, सुशांत पुणेकर, रामचंद्र सुरवसे, गणेश ननवरे, संदीप ताकभाते, विपुल केसकर, प्रवीण कदम, गिरीश पवार, सोन्या गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष ओंकार जाधव, अक्षय सकट, खजिनदार माऊली भुतकर, सहखजिनदार आशिष आवताडे, कार्याध्यक्ष सुमीत वाघमोडे, सहकार्याध्यक्ष प्रणव भगरे, सचिव रोहित पवार, सहसचिव पृथ्वीराज माने, पूजा प्रमुख अभिषेक जाधव, पृथ्वीराज कणसे, प्रसिद्धिप्रमुख फय्याज पठाण, मयूर पवार आदी उपस्थित होते. अमित केसकर यांनी सूत्रसंचालन केले. 

पूरग्रस्तांसाठी शालेय साहित्य... 
सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी सोन्या गणपती प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य "सकाळ'कडे सुपूर्द करण्यात आले. "सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी चादरी, धान्य यासह शालेय साहित्य पाठविण्यात येत आहे. 

सोलापूरकर खरंच स्मार्ट आहेत. सोन्या गणपती प्रतिष्ठानने "सकाळ'च्या माध्यमातून तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबवून पोलिसांविषयी आपुलकी व्यक्त केली आहे. अशाप्रकारच्या उपक्रमांमधून सोलापुरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. सोलापुरातील पोलिस गुणवान असून राज्यात टॉपवर आहेत. 
- अंकुश शिंदे,  पोलिस आयुक्त 

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने चिक्की, राजगिरा लाडू आणि पाणी बाटली सोन्या गणपती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी "सकाळ माध्यम समूहा'च्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी मिळत आहे. 
- शंतनू साळुंखे, आधारस्तंभ, सोन्या गणपती प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com