
सांगली : पलूस तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेने हाणून पाडला. हा बालविवाह करायचाच, अशा जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी बेळगाव विट्यात बाल विवाह होण्याची कुजबूज पसरवून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने आपलीही ताकद दाखवत आटपाडीत होणारा बालविवाह रोखला.