मुले घरी बसली तरी चालतील, पण शाळेत नको 

निरंजन सुतार
Saturday, 28 November 2020

कोरोनामुळे दिवाळीच्या सुट्टीत मामाचं गाव हरवलं. कोरोना मूळे पालकांनी आपल्या पाल्यांना घरीच राहण्याला जास्त पसंती दिली आहे.अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नाकारता येत नाही.

आरग : यावर्षी कोरोनामुळे दिवाळीच्या सुट्टीत मामाचं गाव हरवलं. कोरोना मूळे पालकांनी आपल्या पाल्यांना घरीच राहण्याला जास्त पसंती दिली आहे.अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नाकारता येत नाही. त्यामुळे मुले ही बाहेर खेळ खेळायला न जाता घरीच ऑनलाईन अभ्यास करण्याला पसंती देत आहे. पालक ही आपल्या मुलांना आता शेजारच्या वर्ग मित्र-मैत्रिणी किंवा बाहेर न पाठवता ऑनलाईन अभ्यास वर जास्त जोर देत आहेत. 

त्यामुळे शाळेत पाठवणे खूपच दूर राहिले. हे वर्ष वाया जाऊन मुले घरी बसली तरी चालतील पण शाळेत पाठवणे नको असे बहुसंख्य पालकांचे मत आहे. जिल्ह्यातील 23 नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या पण अजूनही पालकांची मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता नाही. सोमवारपासून शाळेत पाठवण्यास अनेक पालकांनी नकार दिला असून काही पालकांनी महिनाभर वाट पाहूया आणि परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर शाळेत पाठवायचे की नाही हे ठरवू. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा नाही असे बहुसंख्य पालकांचे मत आहे. सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहे.

 दररोज चार तास ऑनलाइन वर्ग भरतात. यात तीन तासिका घेण्यात येतात सर्व भाषा विषय इतिहास भूगोल नागरिक शास्त्र कला हे सर्व विषय ऑनलाइन पद्धतीने सध्या शिकविण्यात येत आहेत. मात्र शाळेत पाठवण्यापेक्षा घरी बसून ऑनलाइनच बरे अशी काही पालकांची मानसिकता आहे. 

कोरोना रुग्ण कमी झाले मात्र संकट अजूनही टळले नाही. जोपर्यंत प्लस येत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही. मग हे वर्ष वाया गेले तरी चालेल त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळण्यास मन धजावत नाही. कोरोनाची दुसरी लाट कधीही येऊ शकते म्हणून पाठवणे धोकादायक वाटते. 
- दिगंबर कोकाटे, पालक, बेडग  

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children can walk at home, but not at school