बालआनंद मेळाव्यातुन मुलांच्या सर्वांगीण विकास होईल-शालिनीताई विखे पाटील

अमोल वाघमारे
गुरुवार, 22 मार्च 2018

सावळीविहीर (अहमदनगर) : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात निव्वळ पोपटपंची शिक्षण न देता त्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी त्यांना सामाजिक, भौतीक आणि आर्थिक ज्ञानप्राप्त व्हावे यासाठी या अभिनव बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या बाल आनंद मेळाव्यातुन मुलांची बौध्दीक पातळी वाढुन सर्वांगीण विकासात वाढ होईल असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी निमगाव येथे केल.

निमगाव येथील जिल्हा परिषद निमगाव-(को.) येथे जिल्हा परिषद साकुरी गटाच्या वतीने आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती हिराताई कातोरे, शिक्षण समितीचे उपाध्यक्ष राजेश परजणे, जि.प.सदस्या पुष्पाताई रोहम, पं.स.सदस्य ओमेश जपे, काळु राजपुत, सरपंच शिल्पाताई कातोरे, उपसरपंच अजय जगताप यांची प्रमुख उपस्थीती होती.

जिल्ह्यातील आदर्श बालआनंद मेळावा बघण्यास मिळाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना ही त्यांनी प्रश्न विचारुन वस्तुंची खरेदी केली. या बाल आनंद मेळाव्यात साकुरी पंचायत समिती गटातील 41 शाळांनी सहभाग घेतला. या बाल आनंद मेळाव्यात सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यात 200 शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा बाल आनंद मेळावा उत्सहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी.वाकचौरे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत शिक्षण विस्तार अधिकारी डी.के.राऊत यांनी केले. आभार एन.टी.गवते यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप वाघमारे, मीरा सांगळे,उज्वला शिंदे यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सी.बी.शिंदे,केंद्रप्रमुख कमल लावरे,मुख्याध्यापक मंगला रणशुर,शिक्षक बॅंकेचे संचालक बाबासाहेब खरात,शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन रावसाहेब सुंबे,जयेश गायकवाड,अरुण मोकळ,संजय सोनवणे,शांताराम शेळके,विवेक गिरी,श्रीमती शैलजा वाघमारे,अशोक गोसावी,नामदेव गमे,विश्वनाथ कांबळे आदींनी प्रयत्न केले. निमगाव ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने या बालआनंद मेळाव्यात सहभाग पहावयास मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
 
Web Title: children get to gather makes development in child personality said shalini patil