इस्लामपूरच्या मुलांचा खारीचा वाटा; खाऊचे पैसे जमवून कोरोना केंद्रास केली मदत

बाळासो गणे
Tuesday, 29 September 2020

कवठेपिरान (ता. मिरज) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांच्या प्रयत्नने सुरु केलेल्या कोविड प्रथमोपचार केंद्रास इस्लामपूरमधील तेली कुटुबातील चौघा मुलांनी खाऊसाठी जमलेले पैसे कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेत आदर्श निर्माण केला.

तुंग (जि. सांगली ) : ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सामाजिक भान जपत लोकसहभागातुन कोव्हिड सेंटर उभे रहात आहेत. समाज मदतीसाठी फुढे येत आहेत.

यामध्ये लहान मुलेही खारीचा वाटा उचलत आहेत. कवठेपिरान (ता. मिरज) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांच्या प्रयत्नने सुरु केलेल्या कोविड प्रथमोपचार केंद्रास इस्लामपूरमधील तेली कुटुबातील चौघा मुलांनी खाऊसाठी जमलेले पैसे कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेत आदर्श निर्माण केला. 

श्री. माने स्वत: संस्कार वाहिनीवरून रुग्णांचे मनोधैर्य वाढवत आहेत. घरी जाऊन त्याना धीर देत आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण वाढण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. कवठेपिरान प्रथमोपचार कोविड सेंटरच्या योगदानामुळे मदतीचा ओघ वाढत आहे.

या कोविड सेंटरला इस्लामपूरमधील प्राजक्ता प्रवीण तेली व प्रथमेश प्रवीण तेली, सार्थक सचिन तेली व सर्वेश सचिन तेली या चिमुकल्यानी खाऊसाठी साठवलेले 777 रुपये श्री. माने यांच्याकडे दिला.

याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. एस. फरास यांनीही 5000 मदतीचा धनादेश सुपुर्द केला. इस्लामपूर पंचायत समितिचे जलसंधारण अधिकारी प्रविण तेली, प्रमोद बुटाले, ग्रामपंचायत कर्मचारी महावीर हाबळे उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: children from Islampur Helped the Corona Center by raising money for food