स्थलांतरित कामगारांची मुले शिक्षण प्रवाहाबाहेरच.....! 

हिंम्मतराव नायकवडी
Friday, 11 December 2020

कोरोनाच्या संकट कार्यकाळात शहरातून, जिल्हातून, राज्यातून लाखो कामगारांचे कुटुंबासह मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. सदरचे विद्यार्थी शाळांमध्ये दाखलपात्र आहेत.

बिळाशी : कोरोनाच्या कार्यकाळात मुळगावी परतलेली किंवा कामाच्या निमित्ताने इतरत्र स्थलांतरित झालेल्या लाखो कामगारांची विशेषतः पहिली ते आठवीची मुले शाळा आठ-नऊ महिन्यांपासून बंद असल्याने तसेच मुळ ठिकाणी परतलीच नसल्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांचा अजुनही शाळांमध्ये प्रवेश झालेला नाही. किंबहुना काही ठिकाणी झाला असल्यास ती आँनलाईन पद्धतीच्या शिक्षण प्रवाहातुन नक्कीच बाहेर असल्याने त्याचे पडसाद बहुतांश शाळांच्या पट संख्येवरही होऊ लागले आहेत. 

कोरोनाच्या संकट कार्यकाळात शहरातून, जिल्हातून, राज्यातून लाखो कामगारांचे कुटुंबासह मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. सदरचे विद्यार्थी शाळांमध्ये दाखलपात्र आहेत. की नाहीत याचे उत्तर अनुत्तरीतच आहे. शासन दफ्तरी तशी कोणतीच नोंद नाही. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून विद्यार्थी शाळाबाह्य असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

स्थलांतरित होऊन मुळगावी किंवा बाहेरगावी परतलेल्या कामगारांच्या मुलांचे अद्याप शाळा प्रवेशच झालेले नाहीत. ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्यिसह तालुक्‍यात, तालुक्‍यातील खेडोपाडी ऊसतोडणी कामगारांची मुले त्यांच्या सोबतच आहेत. अशावेळी या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शाळा प्रवेशासाठी प्रयत्न होणे महत्वाचे ठरणार आहे. 

पन्नास टक्के मुले बाहेरच 
"राज्यात जवळपास अकरा हजारांहुन जास्त खाणी आहेत. दहा-पंधरा लाखांहून अधिक कामगार काम करतात. कामगारांची 0 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास पाच ते दहा लाख मुले आहेत. जवळपास साठ ते सत्तर टक्के दगडखाण कामगार आहेत. 
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children of migrant workers out of education stream .....!