
Sangli Crime News : दुधगाव (ता. मिरज) येथे मुले क्रिकेट खेळत होती. खेळता-खेळता त्यांचा चेंडू गटारात पडला. तो काढण्यासाठी काही मुलं तिथे गेली. त्यांनी काठीने चेंडू बाहेर काढताना पिशवीतून मृत अर्भक बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. काल सायंकाळी साडेसात वाजता हे उघडकीस आले. पोलिस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.