चोविस गुंठ्यात केली मिरची लागवड; रिटायर्ड मुख्याध्यापकांची लाखोंची कमाई

chilli crop in belgaum retired headmaster received rupees 4 lakh
chilli crop in belgaum retired headmaster received rupees 4 lakh
Updated on

कंग्राळी खुर्द (बेळगाव) : येथील एका निवृत्त मुख्याध्यापकाने ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून २४ गुंठ्यात १५० क्विंटलपेक्षा अधिक मिरची उत्पादन केले आहे. सध्याच्या किमान दराने त्यांना चार लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे. पी. डी. पाटील असे त्यांचे नाव आहे.

पाटील यांनी नदीकाठच्या २४ गुंठे क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर करुन ५५३१ या जातीच्या मिरची रोपांची लागवड केली. त्याला ६० दिवस पूर्ण झाले असून उत्पादन खर्च ३० हजार रुपये आला आहे. त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेणखतासह औषधे व रासायनिक खते पिकाला दिली. रोज १० ते १५ मिनिटे पाणी दिले. आता फलधारणा सुरु झाल्याने अर्धा तास पाणी दिले जात आहे. गरजेनुसार खते पाण्यात विरघळून सोडली आहेत. 

एकंदर खर्च एक लाखापेक्षा अधिक आला असून पहिल्या तोड्याला तीन क्विंटल उत्पादन प्रतिक्‍विंटल ३००० रुपये तराने दुसऱ्या तोड्याला १८ क्विंटल मिरची २५०० रुपये दराने विकली गेली आहे. यापुढे किमान १० तोडे होणार असून १५० क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन शक्‍य आहे. किमान २००० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला तरी चार लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न शक्‍य आहे. महत्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानाने लावलेली मिरची वरुन पाने झडली तरी खालून नवीन फुटवा व फुलोरा येतो.  

"गेल्या वर्षी पहिल्यांदाच ठिबक तंत्रज्ञानाचा वापर केला. चांगला नफा मिळाला. लागवड थोडी उशिरा केल्याने शेवटचे दोन तोडे पुरामुळे हुकले. तरीही २४ गुंठ्यांत अडीच लाखांची मिरची झाली. यंदा किमान १० तोडे पुरापूर्वी होणार असल्याने उत्पन्नात वाढ 
होणार आहे."

- पी. डी. पाटील

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com