चितळे उद्योगसमुहाचा आधारस्तंभ हरपला :काकासाहेब चितळे यांचे निधन..  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitale Industry group kakasaheb chitale death in sangli matathi news

चितळे उद्योगसमुहाचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय भास्कर उर्फ काकासाहेब चितळे (वय 78) यांचे आज दुपारी निधन झाले.

चितळे उद्योगसमुहाचा आधारस्तंभ हरपला :काकासाहेब चितळे यांचे निधन.. 

भिलवडी  (सांगली) : चितळे उद्योगसमुहाचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय भास्कर उर्फ काकासाहेब चितळे (वय 78) यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुनिता, मुले उद्योजक गिरीष व मकरंद, मुलगी विणा असा परिवार आहे. आज सायंकाळी येथील कृष्णा घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भिलवडी परिसरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे काकासाहेब अजातशत्रू व्यक्तीमत्व होते.

 भिलवडी सारख्या ग्रामिण भागातून चितळे उद्योगसमुहाची मुहूर्तमेढ 1939 मध्ये काकासाहेबांचे वडील भास्कर गणेश तथा बाबासाहेब चितळे यांनी रोवली. या उद्योगसमुहाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात काकासाहेब व थोरले बंधू नानासाहेब यांचा वाटा राहिला. काकासाहेबांनी गेल्या पन्नास वर्षात दुध व्यवसायाचा विस्तार करताना पंचक्रोशीत जणू धवलक्रांतीच घडवून आणली. त्यांनी जातीवंत दुधाळ म्हैशी आणून त्यांचे या भागात प्रजोत्पादन करण्यासाठी त्यांनी उद्योगसमुहाच्यावतीने मोठे कार्य केले.

हेही वाचा- ब्रेकिंग - संभाजी भिडेंवर अटक वॉरंट -

सामाजिक कार्यात अग्रेसर

पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या काकासाहेबांनी आपल्या व्यवसायातही आर्थिक व तांत्रिक शिस्त आणली. दुध व्यवसाया विस्तारत करतानाच त्यांनी या परिसरात मोठे सामाजिक कार्य उभे केले. त्यामध्ये जायंटस्‌ ग्रुपच्या इंटरनॅशनल फेडरेशनवर ते कार्यरत आहेत. ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी या परिसरात नेत्रदान चळवळ सुरु केली. त्यानंतर भिलवडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला. गावच्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षपद त्यांनी दिर्घकाळ भुषवले. गावातील गोरगरीबांच्या मदतीसाठी त्यांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांच्याप्रति तळागाळात कृतज्ञतेची भावना होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशींवर शोककळा पसरली  

टॅग्स :Sangli