विट्यात कारवाईसाठी चक्क  मुख्याधिकारी रस्त्यावर ः वाचा कशासाठी 

गजानन बाबर 
Thursday, 9 July 2020

विटा (सांगली) ः येथील नगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी धडक मोहीम राबविण्यात येत असल्याने सामान्य नागरिक व व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली. कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून धडक कारवाईच्या मोहिमेत सहभाग घेतला.

विट्यामध्ये प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत.मात्र काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने करोनाच्या फैलावाची शक्‍यता आहे.अशा नागरिकांवर नगरपालिकेच्या पथकाद्वारे कारवाईही केली जात आहे.मात्र तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.

त्यानुसार आता नगरपालिकेने शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर प्रत्येकी 100 रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे.शहरात नियमांची कडक अंमलबजावणी करत या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसांत काटेकोरपणे नागरिकांवर बेधडक कारवाई करण्यात आली.

याशिवाय निर्धारित वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.कारवाई दरम्यान मास्क लावण्याची समज नागरिकांना देण्यात येत आहे. 

                                                       संपादन ः अमोल गुरव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chucky Chief Minister on the road for action in Vita: Read why