जिल्ह्यात कारभारी ठरवण्यासाठी एका एका मतासाठी चुरस 

विष्णू मोहिते 
Saturday, 16 January 2021

जिल्ह्यातील 143 गावांतील कारभारी ठरवण्यासाठी सकाळी साडेसातपासून मतदान चुरशीने झाले. गावागावांत चोख बंदोबस्त होता. अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. महाविकास आघाडी विरोधात भाजपा समर्थकांत लढत झाली.

सांगली : जिल्ह्यातील 143 गावांतील कारभारी ठरवण्यासाठी सकाळी साडेसातपासून मतदान चुरशीने झाले. गावागावांत चोख बंदोबस्त होता. अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. महाविकास आघाडी विरोधात भाजपा समर्थकांत लढत झाली. काही गावात बाचाबाचीचे प्रकार झाले. सकाळी साडेअकरापर्यंत 30 टक्के, दुपारी दीड वाजता 50 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 68 टक्‍क्‍यांवर मतदान झाल्याचे सांगण्यात आले. 

सकाळी साडेसात वाजता मतदान सुरु होण्यापूर्वीच काही केंद्रावर गर्दी झाली होती. वाड्या-वस्त्यांसह मतदान केंद्रापासून दूर रहिवाशी असलेल्या मतदारांना ने-आण करण्यासाठी सरसकट उमेदवार व पॅनेलकडून तीन-चार चाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. सर्वच केंद्रावर मोठा बंदोबस्त होता. संवेदनशील केंद्रावर राज्य राखीव दलाचे जवानही तैनात होते. 

सकाळपासूनच केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. हक्काचे मतदार लवकर बाहेर काढून एक गठ्ठा मतदान कसे मिळवता येईल, यासाठी उमेदवारांनी प्रयत्न केले. दुपारी तीननंतर मतदान कोणी करायचे राहिले याचा शोध घेऊन मतदानासाठी आणले जात होता. परगावच्या मतदारांसाठी विशेष मोहिमच राबवण्यात आली होती. 
... 

नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

एप्रिल ते डिसेंबर 2020 कालावधीत मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. 551 प्रभागातील 1 हजार 508 जागांसाठी 2 हजार 886 उमेदवार निवडणुकच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 68 हजार 226 महिला तर 1 लाख 73 हजार 373 पुरूष, इतर 11 असे 3 लाख 43 हजार 812 मतदार आहेत. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Churas for one vote to decide the steward of the district