कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार नवी ओळखपत्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मतदारांसाठी दिलासादायक बातमी असून कोल्हापूरमध्ये एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मतदारांसाठी दिलासादायक बातमी असून कोल्हापूरमध्ये एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत महापुराने बाधित क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र विनाशुल्क देण्यात येईल.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. या महापुरात या दोन जिल्ह्यातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाचे दस्तऐवज यांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या दोन जिल्ह्यातील नागरिकांना आता बदली मतदार ओळखपत्रे पुरविण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Kolhapur and Sangli district get free new voter ID card