किती खाटा उपलब्ध आहेत, नागरिकांना एका क्‍लिकवर समजणार

Citizens will understand how many beds are available at a click
Citizens will understand how many beds are available at a click

सांगली : कोराना उपचारासाठी शासकीय रूग्णांलयाबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुचिबध्द असणारी नोंदणीकृत असणारी रूग्णालये राखीव ठेवण्यात आली आहेत. या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या खाटांचे सुसुत्रिकरण करता यावे यासाठी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऍप विकसीत करण्यात आले आहे.

आता कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी sangli.nic.in या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोविड-19 मध्ये बेड इन्फॉर्मेशन सिस्टीमवर तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या smkc.gov.in/covid या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

या संकेतस्थळावर बेड माहिती सिस्टिममध्ये पॉझिटीव्ह व संशयीत अशा वर्गीकरणामध्ये कोविड उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या आयसीयु व जनरल वॉर्डमधील खाटांबाबत रूग्णालय निहाय माहिती त्वरीत अद्ययावत करण्याबाबत यंत्रणांना आदेश दिलेत. यामुळे नागरिकांना कोणत्या हॉस्पीटलमध्ये खाटा उपलब्ध आहेत याची वर्गीकरणनिहाय एका क्‍लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. 

कोविड जिल्हा नियंत्रण कक्ष 0233-2374900 व 0233-2375900 या जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर आणि महानगरपालिका 0233-2375500 व 0233-2374500 या दूरध्वनी क्रमांकावरही नागरिकांना माहिती उपलब्ध होईल. नगरपालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त व्यक्तींसाठी रूग्णवाहिका अथवा शववाहिका सेवा आवश्‍यक असल्यास 0233-2373725 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 


तक्रारी टाळण्यास मार्गदर्शक सूचना 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, कोविड उपचारांसाठी राखीव ठेवलल्या रूग्णालयांतील बिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रूग्णालयांनी पात्र रूग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करावेत. तसेच या योजनेमध्ये समाविष्ठ होऊ न शकणाऱ्या रूग्णांकडून शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच बिल आकारणी करावी. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com