शाहूंच्या जयघोषाने दुमदुमले शहर

The city of Dumbledore with the proclamation of Shahu
The city of Dumbledore with the proclamation of Shahu
Updated on

कोल्हापूर :  "मुजरा मानाचा माझा शाहूराजा', "राजर्षी छत्रपती शाहूराजाची दादा राजाची गा...' अशा शाहू गौरवगीतांसह पारंपरिक वाद्यांचा गजर आणि राजर्षी शाहूंच्या जयघोषाने आज सारे शहर दुमदुमून गेले. निमित्त होते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याचे. सिद्धार्थनगर येथील नर्सरी बागेतील या सोहळ्यासाठी हजारो कोल्हापूरकर एकवटले. लोकार्पण सोहळ्यानंतर समाधी स्मारक पाहण्यासाठी खुले झाले. 

सोहळ्याच्या निमित्ताने चार दिवस शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन झाले; मात्र आज साऱ्यांचाच उत्साह टिपेला पोचला होता. मुख्य कार्यक्रमाची वेळ साडेअकराची; पण शहरातील सर्व प्रमुख चौकांत झळकलेल्या राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन करून सारी मंडळी सकाळी नऊपासूनच जथ्थ्याने दसरा चौकाकडे येऊ लागली. शहरातील इतर सर्व पुतळे आणि स्मारक परिसरातही अभिवादनाचे कार्यक्रम झाले. त्याच वेळी शाहू जन्मस्थळ येथून समताज्योत फेरीला प्रारंभ झाला. सिद्धार्थनगर परिसरातूनही फेरी निघाली. दहापासून तर पारंपरिक वेशभूषेमध्ये कोल्हापूरकर सहकुटुंब सोहळ्यासाठी येऊ लागले आणि समाधी स्मारक परिसर गर्दीने गजबजून गेला. "राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय' अशा जयघोषाने सारा परिसर संमोहित झाला. त्याशिवाय समाधी स्मारकाशेजारी सेल्फी सेलिब्रेशनही झाले. येथे अभिवादन केल्यानंतर साऱ्यांची पावलं ऐतिहासिक दसरा चौक मैदानातील मुख्य कार्यक्रमाकडे वळू लागली. येथेही शाहूंचा अखंड जयघोष सुरू राहिला. दरम्यान, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दसरा चौक परिसरातील अकरा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केल्याने वाहतुकीची कोंडी फारशी झाली नाही. 

सिद्धार्थनगरचा आनंदोत्सव 
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धार्थनगर परिसराने आनंदोत्सवच साजरा केला. सिद्धार्थनगर कमानीजवळ गंगाराम कांबळे यांच्या सत्यशोधक हॉटेलची प्रतिकृती साकारली होती. त्याशिवाय शाहूकार्यावर आधारित विविध फलकही उभारले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास राजर्षी शाहू छत्रपती समाधी सिद्धार्थनगर सहभाग कृती समितीतर्फे सिद्धार्थनगर परिसरातून रॅली निघाली. त्यात माणगाव परिषदेच्या चित्ररथांसह पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. ही रॅली झाल्यानंतर परिसरातील आबालवृद्ध मुख्य सोहळ्यात सहभागी झाले. रांगोळ्यांनीही हा परिसर सजला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com