घरी आल्यानंतर बहिणीसमवेत नेहमीच्या गप्पा झाल्यावर तो अभ्यासासाठी खोलीत गेला होता. त्यानंतर त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
मिरज : शहरातील भारतनगर येथील बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या (12th Exam) आदल्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८, गवळी प्लॉट, भारतनगर, मिरज) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.