विट्यात महाश्रमदानातून स्वच्छता 

गजानन बाबर
Tuesday, 2 February 2021

"स्वच्छतेची लोकचळवळ असलेले विटा शहर हे नाविण्यपूर्ण ठरले आहे. कारण शहरात आज सर्व व्यावसायिक बांधवांनी एकमुखी निर्णय घेत संपूर्ण शहरात आज स्वच्छतेचे महाश्रमदान करत शहराला फाईव्ह स्टार करण्यासाठी विशेष योगदान दिले. असे मत वैभव पाटील यांनी व्यक्त केले. 

विटा : "स्वच्छतेची लोकचळवळ असलेले विटा शहर हे नाविण्यपूर्ण ठरले आहे. कारण शहरात आज सर्व व्यावसायिक बांधवांनी एकमुखी निर्णय घेत संपूर्ण शहरात आज स्वच्छतेचे महाश्रमदान करत शहराला फाईव्ह स्टार करण्यासाठी विशेष योगदान दिले. असे मत वैभव पाटील यांनी व्यक्त केले. 

विटा शहराला स्वच्छतेत देशात फाईव्ह स्टार शहर करण्यासाठी शहरातील सर्व व्यावसायिक व नागरिकांनी एकत्र येऊन शहरात संपूर्ण दिवसभर स्वच्छता महाश्रमदानातून शहर स्वच्छ व सुंदर करुन स्वच्छतेची क्रांती केली. त्यावेळी आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. 

या स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान मध्ये शहरातील सर्व व्यावसायिक असोशिएशन यांनी एकत्र येऊन विटा शहराला देशात सर्वाधिक स्वच्छ शहर करण्याचा निर्धार केला होता. याप्रमाणे सर्व व्यावसायिक महिन्यातून दोन दिवस सातत्याने आपले दुकान व परिसर स्वच्छ करत आहेत. व्यापारी व्यावसायिकांनी उत्फूर्तपणे सकाळी 7 पासूनच व्यावसायिकांनी आपआपल्या भागात स्वच्छतेच्या समित्या तयार केल्या. 

या समित्यांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी या स्वच्छता महाश्रमदानाचे आयोजन केले. या महाश्रमदानात व्यावसायिकांनी आपल्या दुकान परिसराची स्वच्छता केली. झाडांच्या कुंड्या ठेवून परिसर सुशोभित केला. काही व्यावसायिकांनी शहर स्वच्छतेचे फलक लावले. शहरात सर्वच भागात प्रत्येक दुकानांपुढे रांगोळी काढण्यात आली होती. कित्येक व्यावसायिकांनी स्वच्छतेची जनजागृती व्हावी यासाठी आपल्या दुकानांपुढे डिजिटल स्क्रिन लावल्या आहेत. 

विटा नगरपरिषदवतीने शहर स्वच्छतेचे ब्रॅंड ऍम्बीसिटर नगराध्यक्ष वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, आरोग्य सभापती दहावीर शितोळे, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, सुभाष भिंगारदेवे, फिरोज तांबोळी यांच्यासह सर्वच नगरसेवक नगरसेविका यांनी या श्रमदान मोहीमेत सहभागी होते. 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaning from Mahashramadana in Vita