एरंडोलीकरांना पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा 

Clear the way for Erandolikars to get drinking water
Clear the way for Erandolikars to get drinking water

एरंडोली : राज्य मार्गाच्या कामात निकामी झालेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनला जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तांत्रिक मंजुरी दिल्याने एरंडोलीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. 

कोट्यवधीचा निधी खर्च करूनही राष्ट्रीय पेयजल योजना चाचणीत दोषी ठरल्याने या योजनेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्फत चौकशी होऊन कारवाई सुरू झाली आहे. 30 वर्षांपूर्वीच्या स्थानिक पाणीपुरवठा योजनेवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. राज्यमार्ग क्रमांक 153 च्या कामासाठी स्थानिक पाणीपुरवठा योजनेची लाईन पूर्णपणे निकामी झाली होती. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून एरंडोलीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. याबाबत "सकाळ'ने या प्रश्‍नाला वाचा फोडली. 

याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने निकामी पाईपलाईन बदलुन मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अंदाजपत्रक मिळाल्याशिवाय करता येत नसल्याचे कारण दाखवून जिल्हा परिषदेकडे पाठवले. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कागदी खेळात एक महिना अंदाजपत्रक लटकत राहिले. या अंदाजपत्रकाला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक मंजुरी दिल्याने या पाईपलाईनचा मार्ग मोकळा झाला आहे. 

एरंडोलीप्रमाणेच सलगरे येथील बाधित झालेल्या पाचशे फूट पाईपलाईनला तत्काळ मान्यता मिळायला हवी. 
- तानाजी पाटील, सरपंच, सलगरे 

सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ताबडतोब काम करून पाण्याचा प्रश्न लवकर निकाली लावावा. 
- शिदगोंडा विटेकर, ग्रामविकास अधिकारी, एरंडोली.


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com