स्थायी समितीच्या सदस्य निवडीचा मार्ग मोकळा...नगरविकास मंत्रालयाचे लेखी आदेश

बलराज पवार
Thursday, 10 September 2020

सांगली-  स्थायी समितीच्या नवीन सदस्य निवडीवरुन रंगलेला वादाला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. नगरविकास मंत्रालयाने ऑनलाईनसभांद्वारे स्थायी समितीच्या निवडी घ्याव्यात, असे लेखी आदेश आज महापालिकेला प्राप्त झाले. त्यामुळे आठ सदस्य आणि सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर स्थायीसाठी इच्छुक सदस्यांच्या आशा जागृत झाल्या आहेत. 

सांगली-  स्थायी समितीच्या नवीन सदस्य निवडीवरुन रंगलेला वादाला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. नगरविकास मंत्रालयाने ऑनलाईनसभांद्वारे स्थायी समितीच्या निवडी घ्याव्यात, असे लेखी आदेश आज महापालिकेला प्राप्त झाले. त्यामुळे आठ सदस्य आणि सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर स्थायीसाठी इच्छुक सदस्यांच्या आशा जागृत झाल्या आहेत. 

स्थायी समितीची मुदत नियमानुसार 31 ऑगस्ट रोजी संपली होती. तत्पुर्वी महापालिका अधिनियमानुसार महासभेत त्या निवडी आणि सभापती निवड होणे गरजेचे होते. सभापती संदीप आवटी यांच्यासह भाजपचे पाच, कॉंग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य बाहेर पडणार होते. शासनाने एप्रिलमध्ये कोरोनाअंतर्गत लॉकडाऊनच्या कालावधीत पुढील आदेशापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थासह कोणत्याही निवडी घेऊ नयेत, विद्यमान समित्यांना मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. त्या आधारे आयुक्त नितीन कापडनीस यांनी स्थायीच्या नवीन सदस्य निवडी घेतल्या नाहीत. तसेच नव्याने निवडीसाठी आठ ऑगस्टरोजी शासनाकडे अभिप्रायही मागविला होता. तो न आल्याने 31 ऑगस्ट रोजी संदीप आवटी यांनी घेतलेल्या सभेत स्थायी समितीला मुदतवाढ असल्याचे जाहीर केले. या निर्णयावर टीकेची झोड उठल्यावर भाजप नेत्यांनी स्थायीच्या मुदतवाढीत स्वारस्य नसल्याचा खुलासा केला. 

दरम्यान, शासनाकडे सर्वपक्षीय नेते तसेच प्रशासनाने याबाबत निर्णयासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार आज नगरविकास मंत्रालयाचे अव्वर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या सहीचे निवडीसंदर्भात पत्र महापालिकेला प्राप्त झाले. त्यामध्ये नव्याने ऑनलाईन सभेत सदस्य आणि सभापतींच्या निवडीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच ऑनलाईन महासभेचे विषयपत्र काढण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष महासभेत भाजपचे गटनेते पाच, कॉंग्रेसचे दोन तर मिरजेच्या एक सदस्यांच्या निवडीचे पत्र देतील. त्यानुसार निवडी होतील. 

स्थायीसाठी इच्छूक सदस्य 
भाजप : शिवाजी दुर्वे, प्रकाश ढंग, नसीम नाईक, पांडुरंग कोरे, गजानन आलदर, संजय यमगर, सुनंदा राऊत, सविता मदने, उर्मिला बेलवलकर. 
कॉंग्रेस : वहिदा नायकवडी, संतोष पाटील, उमेश पाटील, करण जामदार, शुभांगी साळुंखे. 
राष्ट्रवादी : मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, संगीता हारगे, पवित्रा केरिपाळे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clear the way for selection of members of the Standing Committee. Written order of the Ministry of Urban Development