साहेबांच्या प्रेमापाेटी सातारा जिल्ह्यातील बाजारपेठा बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (शुक्रवार) सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती.

सातारा ः राज्य सहकारी बॅंकेतील कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केलेल्या निषेर्धात सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (शुक्रवार) सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यानूसार जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमधील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

वाई येथे सकाळपासून बाजारपेठेत कडकडीत पाळण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांनी नायब तहसिलदार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील करण्यात आलेल्या चुकीच्या कारवाईबाबत निवेदन देण्यात आले.

कोरेगाव, वडूज येथील बाजारपेठ 100 टक्के बंद आहे. खंडाळा येथे सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरीकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. याबराेबरच बुध, ललगुण येथे ही व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे.  आम्ही शरद पवार यांच्या प्रेमापाेटी बंद  ठेवल्याची माहिती विविध तालुक्यांतील व्यापारी यांनी दिली. 

दरम्यान लोणंद, भुईंज, डिस्कळ, सातारा शहर, दहिवडी येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed in the various taluka of Satara district