
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारांचा थंडावण्याच्या मार्गावर असताना प्रचार चांगलाच जोरावला आहे. यंदाच्या या निवडणूक बाबर, पाटील गटासह पडळकर, अपक्ष गटाने बंडखोरी करत दंड थोपटल्याने प्रचार यंत्रणा चांगलीच रंगत आली आहे.
लेंगरे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारांचा थंडावण्याच्या मार्गावर असताना प्रचार चांगलाच जोरावला आहे. यंदाच्या या निवडणूक बाबर, पाटील गटासह पडळकर, अपक्ष गटाने बंडखोरी करत दंड थोपटल्याने प्रचार यंत्रणा चांगलीच रंगत आली आहे. बाबर, पाटील गटात स्थानिक कार्यकर्तेच्या नाराजी झाल्याने बंडखोरीचा झाली. परंतु हेच अपक्ष उमेदवार डोईजड झाल्याने गावपुढाऱ्याची डोकेदुखी वाढली आहे. बाबर, पाटील गटात सत्ता मिळविण्यासाठी टशन असल्याने निवडणुकीस चांगलाच रंग चढल्याने प्रचारास रंगत चढली आहे.
ग्रामीण भागात आमदार अनिल बाबर यांचा गट सक्रिय आहे. याबरोबरच माजी आमदार सदाशिव पाटील गटाचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाले आहे.या दोन्ही गटात गलाई व्यावसायिकांचा चांगलाच सक्रिय सहभाग असतो. या व्यावसायिकांचा आमदारकीच्या वेळी चांगलाच हातभारही लागतो.त्यामुळे त्यांची नेत्यांची जवळकी वाढली आहे.गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीतही चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मताचे दर वाढण्यास सुरवात झाली आहे.
गावातील वार्डातील काही लढती प्रतिष्ठितेच्या बनल्यामुळे त्या उमेदवार लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यासाठी त्या वार्डातील मतदारांच्या मतांचे दर वधारले असून रात्रीस खेळ करण्यास सुरवात केली आहे.या सगळ्यावर मात्र आचारसंहिता समिती, पोलिस प्रशासनाची बारीक नजर ठेवली आहे. अवैधरीत्या दारू विक्रेत्यावर कारवाई करत तंबी देण्यात आली आहे. जेवणावळीचे कार्यक्रमास जोर चढला आहे. याबरोबरच अफवांना चांगलेच पेव फुटले आहेत.
देविखिंडी, भिकवडी, माहुली, नागेवाडीत बाबर, पाटील गटांचा आमनासामना रंगला आहे. देविखिंडी अपवाद वगळता सर्वत्र दोन्ही गटात चुरशीच्या लढती आहेत. गावातील गाव पुढाऱ्यांनी काही वार्डातील लढती प्रतिष्ठेच्या बनवत पैशाची उधळण करण्यास सुरवात केली आहे. मात्र या सगळ्यावर प्रशासनाचे लक्ष असल्याने रात्रीस खेळ करण्यास सुरवात केली. वाडीवस्त्यावर गुप्त बैठकी घेण्यास सुरवात केली असून कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
संपादन : प्रफुल्ल सुतार