esakal | शिक्का पुसलात तर सरकारी क्वारंटाईनची "शिक्षा' 
sakal

बोलून बातमी शोधा

A closer look at "Home Quarantine"; Government quarantine "punishment" if the seal is wiped

सांगली : महापालिका क्षेत्रात होम क्वारंटाईन असलेल्यांवर प्रशासनाची करडी नजर आहे. तरीही होम क्वारंटाईनचा शिक्का पुसण्याचा प्रकार काही महाभाग करत आहेत. त्यामुळे असा प्रकार केल्यास त्यांना जबरदस्तीने सरकारी क्वारंटाईनची शिक्षा करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

शिक्का पुसलात तर सरकारी क्वारंटाईनची "शिक्षा' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात होम क्वारंटाईन असलेल्यांवर प्रशासनाची करडी नजर आहे. तरीही होम क्वारंटाईनचा शिक्का पुसण्याचा प्रकार काही महाभाग करत आहेत. त्यामुळे असा प्रकार केल्यास त्यांना जबरदस्तीने सरकारी क्वारंटाईनची शिक्षा करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संशय असलेल्या सुमारे तीनशेहून अधिकजणांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. परदेशातून आलेल्या तसेच काही पुणे, मुंबईतून आलेल्या नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही परदेशातून आलेल्यांना होम क्‍वारंटाईन करा असे आदेश दिले होते. महापालिका प्रशासनानेही हे पाऊल उचलले आहे. 

होम क्‍वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या हातावर प्रशासनातर्फे शिक्के मारले जातात. त्यामुळे हे नागरिक होम क्‍वारंटाईन असल्याचे लक्षात येते. मात्र असे शिक्के दिसल्यास या आपल्यावर बहिष्कार टाकतील की काय या भीतीने शिक्का मारल्यानंतर तो पुसण्याचा प्रकार काहींनी केल्याची चर्चा आहे. शिक्‍क्‍याची शाई निवडणुकीत मतदानावेळी खूण करण्यासाठी वापरतात तीच असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही शिक्का मारल्यानंतर लगेच ती पुसल्यास निघून जाते. त्यामुळे अशा व्यक्ती पुन्हा समाजात फिरू लागतात. होम क्‍वारंटाईनची काळजी घेत नाहीत. त्यामुळे इतरांनाही धोका होण्याची शक्‍यता असते. प्रशासनाने अशा व्यक्तींवर नजर ठेवली आहे. 

सरकारी क्‍वारंटाईनमध्ये भरती 
शहरातील काहींनी हातावर मारलेले होम क्वारंटाईनचे शिक्के पुसण्याचा प्रकार केल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा व्यक्तींनी शिक्के पुसल्याचे आढळल्यास त्यांना महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्‍वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल असा इशारा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिला आहे. 

प्रशासन काय करते? 
महापालिकेच पथक होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येते. अशा व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यांनी क्वारंटाईन केल्यापासून 14 दिवस घरीच थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्यावर महापालिकेचे आरोग्य पथक दिवसातून दोनवेळा चौकशी करते. मग, त्यांना शिक्के पुसलेले कसे लक्षात येत नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.