साईबाबांबाबत मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यामुळे नाराजी 

CMs statement hurt the feelings of Shirdi villagers
CMs statement hurt the feelings of Shirdi villagers

शिर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पाथ्री गावाचा उल्लेख "साईबाबांचे जन्मस्थळ' असा केल्याने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची बैठक घ्यावी व यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेखावरून वाद होणार नाही, याबाबत सरकारी पातळीवर काळजी घ्यावी, अशी मागणी साईबाबा संस्थानाचे माजी विश्वस्त व प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केली आहे. 

औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाथ्री हे "साईबाबांचे जन्मस्थळ' असल्याने तीर्थक्षेत्र विकासातून गावाला मदत करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर देश-विदेशातील साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत आपल्या पंथाचा अथवा जन्मस्थळाचा कोठेही उल्लेख केला नाही.

जाणीवपूर्वक सरकारची दिशाभूल

साईबाबांच्या जीवनकार्याबद्दल संपूर्ण अधिकृत माहिती ही साईसत्‌चरित्रातच आहे. मात्र, तरी काही लोक जाणीवपूर्वक साईबाबांच्या जन्मस्थळाची चुकीची माहिती देऊन साईभक्त व सरकारची दिशाभूल करीत आहेत. यापुर्वीही राष्ट्रपती शिर्डीत आले असताना, त्यांच्या भाषणात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख झाला होता. त्यावेळी शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. 

शिर्डी ग्रामस्थांनी थेट राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेऊन साईबाबांच्या जन्मस्थळाबाबतचा त्यांचा गैरसमज दूर केला. त्यानंतर हा वाद संपुष्टात आला. मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना, काहींनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगून तेथे विकासनिधी देण्याची घोषणा केली.

निधीबाबत आक्षेप नाही.

निधी देण्याबाबत साईभक्त अथवा शिर्डी ग्रामस्थांचा कोणताही आक्षेप नाही. फक्त "साईबाबांचे जन्मस्थळ' या उल्लेखाला शिर्डीकरांचा, भक्तांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना लवकरच शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांना भेटून वस्तुस्थिती सांगणार असल्याचे समजले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com