
सांगली : पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील विविध संस्था-व्यक्ती आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये सांगलीतील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप संस्थेने अविरत प्रयत्न कायम ठेवले आहेत. या संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी बिया संकलन आणि त्यांचे पश्चिम घाटात या बियांचे रोपण हा उपक्रम वैशिष्टयपूर्ण असा आहे. तब्बल 19 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आत्तापर्यंत 19 लाखांवर बियाण्यांचे संकलन आणि वाटप झाले आहे.
संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्यस्तरीय बिया संकलन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. हे वर्ष संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने केले जात आहे. शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांमध्ये निसर्ग रक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे कार्य घडावे हा स्पर्धेचा हेतू आहे. शाळकरी मुलांपर्यंत वृक्षलागवडीची ही मोहीम पोहोचवण्याचा भाग म्हणूनही ही स्पर्धा होत असते.
फळ खाल्ल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या बिया, तसेच झाडावरून या दिवसांमध्ये गळून पडणारे बिया वाया जात असतात. अशा बियांपासून रोपे निर्मिती होऊ शकते, यासाठी बिया संकलित करणे व योग्य पद्धतीने जमिनीमध्ये रुजविणे आवश्यक असते. दरवर्षी हजारांवर रोपे तयार केली जातात. चाळीस हजारांवर बिया टोकल्या जातात. या बियांपासून पाच हजार सीड बॉल्सही बनवले जातात. काही बिया आवश्यक त्या ठिकाणी भेट स्वरूपात दिल्या जातात. दरवर्षी लाखांवर बियांचे संकलन आणि वाटप होते.
प्रा. शशिकांत ऐनापुरे या स्पर्धेविषयी म्हणाले,""स्पर्धेसाठी 1 मे पर्यंत नावे नोंदवावीत. 5 जून पर्यंत संकलित बिया संस्थेकडे जमा कराव्यात. आपल्या परिसरातील झाडांच्या बिया संकलित कराव्यात. उपयुक्त तसेच औषधी वनस्पती पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त वनस्पती जंगली वनस्पती यानुसार वर्गीकरण करावे. बिया जमा करताना त्या झाडांबद्दलची माहिती द्यावी. बिया सुकवूनच जमा कराव्यात. या बिया राखेमध्ये मिसळल्यास कीड लागण्याचे प्रमाण अतिशय कमी होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमधील हरित सेनेच्या शिक्षकांकडे द्याव्यात किंवा स्पर्धेच्या गुगल फॉर्मवर आपली नावे नोंदवावीत. संपर्क पत्ता सम्यक क्लिनिक, अनुतेज प्लाझा, कुपवाड रोड, सांगली. पहिल्या पाच विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तिपत्रक दिले जाईल.''
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.