
सांगली- "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीही मार्केट यार्डात गर्दी होत आहे. त्यामुळे येथील रिटेल विक्री व सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
येथील मार्केट यार्डमध्ये गेले काही दिवस गर्दी होत असून त्याबद्दल तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज बाजार समितीमध्ये बैठक झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, पोलीस निरिक्षक श्री. तनपुरे आदींसह व्यापारी, पुरवठाधारक, बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ""मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग यशस्वी करण्यासाठी येथील रिटेल विक्री पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक घरगुती कारणासाठी कोणीही ग्राहक येथून माल खरेदी करु शकणार नाही. तसेच मार्केट यार्ड परिसरातील बॅंका आणि सहकारी पतसंस्थामधील गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या वेळे दुपारी 12 ते सायंकाळी 5 असा बदल करण्यात येत आहे. हा बदल मार्केट यार्ड परिसरातील कार्यरत बॅंका व पतसंस्थांसाठीच आहे. यार्डात घेण्यात येणाऱ्या सौद्यांसाठी गर्दी जमा होते. त्यामुळे ती टाळण्यासाठी पुढील आदेशापर्यंत सौदे होणार नाहीत. अडते, पुरवठादार यांनी एकत्रित येऊन मालाच्या किंमती निश्चित कराव्यात. ई-नाम प्रणालीद्वारे ऑनलाईन सौदे करता येतील का याचीही चाचपणी केली जाईल. यार्डात पोलिस प्रशासनामार्फत हमाल, व्यापारी, कामगार यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाईल.''
यार्डात येणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच मार्केट यार्ड परिसरात काम करणारे हमाल, व्यापारी, कामगार यांची आरोग्य शिबिरातून तपासणी करण्याचेही ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.