ऐच्छिक विषय असलेल्या महाविद्यालयातच स्वतंत्र विभाग

- संदीप खांडेकर
गुरुवार, 2 मार्च 2017

कोल्हापूर - शारीरिक शिक्षण विषयासंदर्भात बत्तीस महाविद्यालयांचा अभ्यास करताना असे आढळून आले, की हा विषय ऐच्छिक घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३०१ इतकी होती. शारीरिक शिक्षण विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा आकडा अन्य विषयांच्या तुलनेत कमी आहे. तसेच ज्या महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण हा विषय ऐच्छिक आहे, तेथे शारीरिक शिक्षणाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र, अन्य महाविद्यालयांत तसा स्वतंत्र विभागच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

गट ‘अ’मध्ये शारीरिक शिक्षण ऐच्छिक असणारी, तर ‘ब’मध्ये शिवाजी विद्यापीठातील आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या गुणानुक्रमे सोळा महाविद्यालयांचा समावेश केला होता. गट ‘ब’मधील बहुतेक महाविद्यालयांत एक शारीरिक संचालक कार्यरत आहेत. गट ‘अ’मधील चौदा महाविद्यालयांत एकोणीस शारीरिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या नेमणुका वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर कायमस्वरूपी आहेत. शिक्षकांची पदे ही शारीरिक शिक्षण संचालकांव्यतिरिक्त आहेत. गट ‘ब’मधील महाविद्यालयांत शारीरिक शिक्षण विषय ऐच्छिक नसल्याने त्या ठिकाणी स्वतंत्र शारीरिक शिक्षण अध्यापक अशी कोणाचीही नेमणूक नाही. मात्र, शारीरिक शिक्षण संचालक कार्यरत आहेत. ‘अ’ गटातील महाविद्यालयात आठ, तर ‘ब’ गटातील महाविद्यालयांत सहा लिपिक कार्यरत आहेत. तसेच प्रत्येक महाविद्यालयांत एका शिपायाच्या नेमणूक केली आहे; पण कोणत्याही महाविद्यालयात स्टोअर कीपर, मदतनीस, ग्राउंडस्‌मन, माळी असे कर्मचारी कार्यरत नाहीत. 

यातील विशेष बाब म्हणजे कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट फुटबॉल या सांघिक खेळात दोन्ही गटांतील महाविद्यालयांचा समावेश चांगला आहे. टेबल-टेनिस, टेनिस खेळात सहभाग कमी असल्याचे दिसून आले आहे. 
महिला विभागाचा विचार करता कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग उत्तम आहे. 

वैयक्तिक क्रीडा प्रकारात दोन्ही गटातील महाविद्यालयांच्या सहभागात फारसा फरक आढळत नाही. महिला गटातील वैयक्तिक क्रीडा प्रकारात ‘अ’ गटातील महाविद्यालयांचा ‘ब’ गटातील महाविद्यालयांपेक्षा सहभाग कमी आहे. याचा अर्थ शारीरिक शिक्षण हा ऐच्छिक विषय घेऊन शिकणाऱ्यांचे वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभाग कमी आहे. (क्रमश:)

गांभीर्याचा अभाव
राज्यातील एकूण २७ विद्यापीठे किंवा तत्सम दर्जा असणाऱ्या शैक्षणिक संस्थांतील फक्त सहा संस्थांत शारीरिक शिक्षण विषयास महत्त्व दिले जाते. शारीरिक शिक्षण विषय विद्यार्थ्यांच्या करिअरला आकार देणारा असूनही त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही, असाच तज्ज्ञांचा सूर आहे.

Web Title: college the elective independent sector