महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घेतला कुटुंबाच्या विवंचनेतून गळफास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पापरी (ता. मोहोळ) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आकाश बाळासाहेब भोसले (वय 19) असे मृत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव आहे.

मोहोळ (सोलापूर) : विवाहयोग्य बहिणीचा विवाह कसा करायचा, घरही बांधलेले नाही, तसेच आई-वडील भोळसर आहेत, या विवंचनेतून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पापरी (ता. मोहोळ) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आकाश बाळासाहेब भोसले (वय 19) असे मृत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव आहे.

चुलत्याच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पापरी येथील बाळासाहेब भोसले यांचा आकाश नावाचा एकुलता एक मुलगा. वडील बाळासाहेब व आई दोघेही भोळसर आहेत तसेच घरात बहीण विवाहयोग्य झाली आहे, तिचा विवाह कसा करायचा; तसेच घरही बांधलेले नाही, या तणावाखाली आकाश कायम असायचा. याच नैराश्‍यातून त्याने चुलते मनोहर भोसले यांच्या शेतातील बांधावरील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर मोहन नारायण भोसले यांनी मोहोळ पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलिस नाईक एस. डी. पवार करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College student commits suicide