सोमवार सकाळीच बाहेर पडा; आज-उद्या मुक्त संचारावर निर्बंध

Come out on Monday morning; Restrictions on free communication today and tomorrow
Come out on Monday morning; Restrictions on free communication today and tomorrow
Updated on

सांगली ः कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जाहीर झालेल्या नियमावलीचा भाग असलेली कडेकोट संचारबंदी उद्या (शनिवारी) व रविवारी लागू होत आहे. 30 एप्रिलपर्यंत लागू असलेल्या या नियमावलीनुसार शनिवार व रविवारी आठवडाअखेरची टाळेबंदी राहणार आहे. शुक्रवारी (ता. 9) रात्री आठपासूनच तिची अंमलबजावणी सुरू झाली. 



नव्या नियमावलीनुसार अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. दोन दिवसाच्या संचारबंदीच्या पूर्वसंध्येलाच आज शहरात खरेदीसाठी धावपळ वाढली होती. आठनंतर रस्ते सुने-सुने जाणवू लागले. संचारबंदीच्या काळात योग्य काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याची मुभा असेल.

दोन दिवसाचा हा कर्फ्यूच असेल. शासनान कठोर निर्बंध असे नामकरण केले आहे. सोमवारी सकाळी आठनंतर टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा जमावबंदी सुरु होईल. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. सायंकाळी त्यांनी प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. 


यासाठी असेल संचार मुभा 

  •  सोमवारी सकाळी 7 पर्यंत रेल्वे, बसेस, विमानाचे बुकिंग तिकीट सोबत हवे. 
  •  औद्योगिक कामगारांना ओळखपत्र असेल तर कामाच्या वेळेतच संचार मुभा 
  •  परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र सोबत असेल तरच मुभा 
  •  दोन दिवसात विवाहासाठी अटीनुसार पन्नास जणांनाच मुभा 
  •  अंत्यसंस्कारासाठी वीस जणांना संचार मुभा 

नियम पाळून हे सुरू राहील 

  •  दवाखाने, औषध दुकाने विमा कार्यालये, सर्व आरोग्यसेवा 
  •  किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, भाजी मंडई 
  •  सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, टॅक्‍सी, रिक्षा व सार्वजनिक बसेस 
  •  वस्तूंची वाहतूक, सर्व प्रकारची माल वाहतूक, शेती विषयक सेवा 
  •  गॅस एजन्सी व पेट्रोल, डिझेल पंप, शासकीय, खासगी सुरक्षा सेवा 

गरज असेल तरच बाहेर पडा
जिल्ह्यातील वाढते रुग्ण पाहता कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन आता अनिवार्य झाले आहे. परिस्थिती गंभीर होण्याआधी सर्वांनी सावधपणे जबाबदारीचे भान ठेवून वर्तन करणे गरजेचे आहे. यापुढे नेहमीच गरज असेल तरच बाहेर पडा.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com